Skip to main content

Posts

भारतीय सुवर्णपरी हिमा दासचा जीवन प्रवास प्रत्येक सच्च्या भारतीयासाठी प्रेरणादायक आहे

        एक महिन्यामध्ये सलग ५ सुवर्णपदक मिळवणे असामान्य गोष्ट आहे. ते करून दाखवलंय आपल्या सुवर्णपरी हिमा दासने. वाऱ्याच्या वेगाने धावणारी १८ वर्षाची हिमा दास भारताची “सुपर गर्ल” म्हणून ओळखली जाऊ लागलीय. सगळीकडे भारताच्या नावावर सन्मानाचे पदक घेऊन येऊन हिमाने नवीन रेकॉर्ड तर रचलेच आहेत सोबतच आपली मान अभिमानाने उंचावली आहे. अर्थात हा प्रवास तिच्यासाठी अजिबात सोपा नव्हता. दिवसभर अंग पिळवटून जाईपर्यंत मेहनत करून नंतर पोटभर जेवून मऊ गादीवर लोळण्याइतकं तर सोडा पण साधं धावताना पायात धावण्यासाठी उपयुक्त असणारे जोडे देखील हिमा घेऊ शकली नव्हती. तशी परिस्थितीही नव्हतीच म्हणा. “ढिंग एक्सप्रेस ते सुपर गर्ल” हिमा दास आसाममधील ढिंग, नागाव या छोट्याश्या गावात लहानाची मोठी झाली. ५ भावंडात सर्वात लहान असलेली हिमा जोनाली दास व रणजित दास यांची मुलगी आहे. हिमाचे आईवडील शेतकरी असून त्यांची भाताची शेती आहे. लहान असताना हिमा आपल्या वडिलांच्या शेतजवळच सामावसक मुलांसमवेत फुटबॉल खेळात असे. तिचा कल फ़ुटबाँल मध्ये असला तरीही तिच्या धावण्याचा वेग पुष्कळ चांगला होता...

महाकाय हत्तींशी सहज संवाद साधणाऱ्या एका “गजानंदाची गोष्ट”

हल्ली जग असं झालंय की माणसाला माणसाशी संवाद साधायला वेळ नसतो, त्यांना तशी किंवा इच्छाच नसते. जगातील सर्वात धोकादायक प्राणी कुठला असेल तर तो मनुष्य हा आहे. ह्या मनुष्याने स्वतःच्या स्वार्थासाठी सतत निसर्गाला, पर्यावरणाला गृहीत धरलेले आहे. “ह्यूमन्स डोन्ट डिझर्व्ह धिस प्लॅनेट” हा व्हिडीओ तर बहुसंख्य लोकांनी फेसबुक, इंस्टाग्रामवर बघितला असेलच. आपल्या स्वार्थासाठी आपण झाडे, पाणी,हवा, आकाश ,पक्षी,प्राणी अगदी सूक्ष्मजीवांना सुद्धा युझ अँड थ्रो करतो. लेदर हवंय का? करा शिकार! प्राण्याचं कातडं आवडलं का? करा शिकार! गेली हजारो वर्षे आपण पृथ्वीवरील एकूण एक गोष्ट अब्युज करत आलो आहोत. होय! आपल्या वागण्यासाठी Abuse हा एकच शब्द अगदी चपखल बसतो. आपल्याच स्वार्थीपणामुळे पृथ्वीवर वास्तव्य केलेले, त्यांच्याही पृथ्वीवर आपल्याच इतका हक्क असलेले अनेक प्राणी आपण नामशेष करून टाकले आहेत. जगातला सध्याचा एक्सटिन्क्शन रेट बघितला तर आपण किती क्रूर आहोत ह्याची खात्रीच पटेल. दर वर्षी शेकडो प्रजाती नामशेष होत आहेत. हा जो रेट आहे तो नैसर्गिक रेट पेक्षा हजार पटींनी जास्त आहे. असेच सुरु राहिले तर येत्या काह...
*" हिंदवी परिवार"* या शब्दामध्ये परिवार हाच शब्द का वापरला गेला ह्याच उत्तर मला खूप वेळा मिळत नव्हतं आणि कोणाला विचारायची हिम्मत सुद्धा कधी झाली नाही. पण जसजसं हिंदवी परिवारासोबत जोडलो गेलो त्यांच्या राष्ट्रबांधणीच्या  काही कार्यात मला ही ते सामावून घेत होते,त्याचा मला सार्थ अभिमान आहे, तेव्हा "गुरुवर्य डॉ शिवरत्न" शेटे सरांनी आपल्या व्याख्यानातून हिंदवी परिवराबद्दल सांगत असताना ते म्हणत आम्ही राष्ट्र बांधणीसाठी हा परिवार निर्माण उभा करत आहोत. पण ह्याची प्रचीती मला ह्या वर्षीच्या पावसाळी मोहिमेत घडली हिंदवी परिवार आयोजित पन्हाळा ते पावनखिंड मोहिमेत गेल्या वर्षी प्रमाणे यंदाही मला सहभागी होण्याचे मिळाले. सोबत काही मित्र होते माझ्यासारखीच सर्वांची पैश्याची कटकट असल्याने प्रायव्हेट गाडी करून पन्हाळा पावनखिंड मोहीम करणे परवडत नसल्याने आम्ही सारे मित्र एक दिवस अगोदर कोल्हापूर गाठून तिथून दुसऱ्या दिवशी मोहिमेत सहभागी होण्याचे ठरवले. ठरवल्याप्रमाणे आम्ही सारे पन्हाळा येथे हिंदवी परिवाराच्या नियोजित वेळे नुसार गडावर पोचलो. डॉ शिवरत्न शेटे सरांचं व्याख्यान,प्...

Love success 💕 - एक छोटीशी लव्ह स्टोरी😘

       शाळेत वार्षिक क्रीडा सप्ताह चालू होते..शाळा पूर्ण त्या क्रीडा सप्ताहात दणाणून निघाली होती... आणि क्रीडा सप्ताह म्हणजे शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांच्या आवडीचा विषय कुठलेच तासिका होतं नव्हते..त्यामुळे अभ्यासाचा त्रास नाही, बोरींग तासिका नाही, आणि मूळ आनंद म्हणजे घरच्यांना सांगायला एक कारण होत की आज घरचा अभ्यास नाही त्यामुळे सगळीच अत्यंत आनंदच वातावरण ह्या क्रीडा सप्ताहात चालत असतं ...         हे सगळं असं चालू असतानाच त्या दिवशी सुद्धा क्रीडा सप्तहात कबड्डीचा खेळ सुरू होता आमच्या वर्गाचं मॅच अजून दोन मॅच नंतर होता..त्यामुळे आम्ही मैदानात इतरत्र विविध गोष्टी व विविध व्यक्ती न्हाहळत होतो.           मग आम्ही काही मित्र हे सगळं करत मैदानात एका कोपर्याला कट्यावर बसलो होतो काही वेळाने आम्हची मित्रांची सगळी गँग बाथरूम कडे वळाली.. सोबत तिथंच पडलेली काही मातीचे खडे हातात घेऊन पुढे फेकत निघालो होतो... क्षणातच एका मित्राला नवीनच कल्पना सुचली आणि तो जोरात ओरडला      "बाथरूमच्या फुटलेल्या खिडकीत जो कुणी इथून द...

वृक्षारोपण

आनंदी जगण्याचं एक साधन.. म्हणजे पर्यावरण रक्षण.....             काही ठिकाणी पाऊस पडत आहे तर काही ठिकाणी अजून तो जोम धरला नाही. हे दाटून आलेले ढग पाहता वाटते थोड्याच काळात तेही बरसतील .भरपुर व दमदार पाऊस होईल अशी आशा आहे.     यंदाच्या वर्षाचा वाढलेले तापमान पाहता पुढील भविष्यकाळ सुखाचा आणी समृद्धीचा जाण्यासाठी आपल्याला वृक्षारोपण आणि त्याच संवर्धन करायला शिकलं पाहिजे,     चला एक नवीन वसा हाती घेऊया, पावसाळ्याच्या या पाणीमय वातावरणात स्वतःच्या नावाने स्वतः एक रोपटे लावुया व त्याला जगवुया. आपल्या येणाऱ्या पिढीला देवु एक नवीन वारसा...... स्वच्छ संस्कृती सोबत हिरवाईने नटलेला भारत देशा...... __________________बसव

अश्विनी ताई

   अश्विनी ताईनं माझ्या आणि तिच्या परवाच्या भेटी नंतर लिहिलेली कविता          एका सामाजिक कार्यक्रमात जमखंडी सर कोठे आहेत म्हणून मलाच विचारून माझ्याशी जोडली गेलेली ताई आज माझा लहान भाऊ आहे हा म्हणून हक्काने जगाला सांगणारी हीच ती ताई..            हेल्प लाईन नावच्या ग्रुप मधून संपर्कात आलो त्यानंतर ह्यां ना त्या कार्यक्रमात येऊ लागलो भेटू लागलो, ज्यामध्ये एकमेकांची नात जुळत गेलं आणि एक भाऊ बहिणीचं नात गुंफत गेला...        एकमेकांच्या कार्याला धावून येण्यात दोघेही तत्पर होतो. मोठी ताई नाही पण अश्विनी ताई नेहमी मला माझ्या काळजी खातीर फोन करून जेवण कर,आराम कर,जास्त काम करू नकोस उन्हात फिरू नकोस,ह्या गोष्टी लहान भावा सारख सांगत असते, तेव्हा खरंच मला कधीकधी अभिमान वाटतो स्वतःचा की अशी माणसं मला भेटलेत की ज्यांची तुलना कोण बरोबर ही नाही होऊ शकत.     एकदा मी आजारी पडलो होतो, तेव्हा तीनं  तिच्या पायात दुखापत असूनही मला हक्काने घरी येईन दवाखान्यात नेलं होतं, गोळ्या-औषध तर नंतर मिळालं पण ती आली...

🏨मोडक्या बेंच वरील मस्ती✍

                काही दिवसांपूर्वी माझ्या शाळेतील बालपणीचे मोजके सात-आठ मित्र एकत्र भेटण्याचा योग जुळून आला. त्या वेळी फक्त एक फ़ोन लावताच आणखी काही मित्र भेटीला धावून आले, त्यांना हि खूप दिवसापासून भेटीची ओढ लागून होती. काही मित्र शिक्षणासाठी किंवा नोकरी साठी बाहेरगावी होते त्यांची भेट नाही होऊ शकली. मग अचानक ठरलेल्या ह्या भेटीत खूप साऱ्या  गप्पांनी वेळ निघून जात होता.त्यात खूप जणांचा मधेच फोन येत-जात होता, त्यावरून मला तर कळलं की माझ्या व्यतिरिक्त इतरही खूपच बिझी आहेत त्याचा मनसोक्त आनंद झाला.          त्याच शाळेतील त्याच जुन्या बेंच वरील ती जुनी आठवणीची कहाणी रंगत चाली होती. आणि वेळ कसा निघून जात होता हे काही कळतच नव्हत, पण काही कारणास्तव आम्हाला सर्वाना निघावं लागल. सर्वांनी ठरवलं कि लवकरच आपण पुन्हा एकदा भेटायचं त्याच शाळेत पुन्हा एकदा दंगा करण्यासाठी, मस्ती करण्यासाठी व एकमेकांची खिल्ली उडविण्यासाठी, मग मी ही म्हणालो "मग ठरलं तर आपण येत्या शिक्षक दिनी भेटायचं" बेत ठरलं आणि आम्ही आपापल्या घरी निघालो.  ...