रूपा ताईच्या घरी कलासंगमच्या संस्थापिका शोभा ताई बनशेट्टी यांची महापौर पदी म निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यासाठी एकत्र जमायचं ठरलं होतं, आम्ही सारे त्यांना आंटीच म्हणत आलोय, कोण कोण येणार याची चर्चा रांगोळीच्या दिवशी आणि दोन दिवस झालं त्या व्हाट्सएपच्या ग्रुपवर देखील चालू होतं, नवीनच ग्रुप तयार झाला होता त्यामुळे ग्रुप मधील मंडळी ही नवीन नंबर सेव्ह नसल्याने फक्त बोलायचं म्हणून बोलत होतो, कोण काय प्रश्न टाकत होते हे मात्र कळत नव्हतं काहींनी तर पार्टी तर काहीं आईस्क्रीम ची ऑर्डर तर काहींना पाणी पुरीची हौस तर काहींनी आपलं विचार करूनच फक्त चॉकलेट वर समाधान म्हणाले तर कित्येकांनी देऊ की म्हणाले आणि मी ही कोणीतरी चॉकलेट मागितलय म्हणून मी पुढचा मागचा विचार न करता देतो की उद्या भेटल्यावर असं ग्रुप वर sms केलो. मी नेहमीसारखा लवकरच येवून पोचलो होतो, काहीजण जमले होते तर आणखी काहींना यायला उशीर होता, मी अजून तसा ह्या ग्रुप मध्ये नवीनच होतो, पण रांगोळीच्या मध्ये घातलेली धांदली मुळे मी सगळ्यांच्या जवळचा झालो होतो सगळेच ...
" जगावेगळं काम करायला सगळ्या जुन्या वाटा सोडायची आणि चौकटी मोडायची गरज नाही ..मनापासून जगता जगता अगदी सहज जगावेगळं काम होऊन जातं "