शिक्षक दिनाच्या शुभेच्छा...💐💐💐
जिथे आम्ही घडलो ती ही शाळा,,,,,,,इथले प्रत्येक शिक्षकांनी मुलांना घडविण्यात धन्यता मानली आहे...सकाळी 11 ते संध्याकाळी5 पर्यंतच बौद्धिक शिक्षणासोबत आयुष्याच्या वाटेवर कसं जगावं हे सुद्धा ह्याच शिक्षकांनी आम्हाला शिकवलं...बहुआयामी व्यक्तिमत्वांनी भरलेली ही शाळा, ह्या शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, ह्या सर्वांसोबत एक वेगळंच नात जडलंय.. ते शब्दात व्यक्त करणं तसं जरा अवघडच आहे..
नेताजी सुभाषचंद्र बोस हायस्कूल मध्ये आमचं ssc पर्यंतच शिक्षण झालं.आमची 2010-11 ची बॅच. मी, माझं घर, माझं कुटुंब एवढ्या पुरता मर्यादित असणाऱ्या मला ह्याच शाळेत ह्याच शाळेतील शिक्षकांन खूप सारे मित्र आणि न पेलता येणार भलं मोठं कुटुंब दिलं. त्याच तर मी आयुष्यभर ऋणी राहीन..
माणूस म्हणून जगताना ह्या शिक्षकांनी शिकविल्या प्रत्येक गोष्ट आज उपयोगाला येथे..स्वच्छता, शिस्तपणा, आदर, सुसंस्कृत, देशभक्ती, शिक्षण या नीतिमूल्ये जपत मुलांना घडविण्यात ह्या शाळातील प्रत्येक शिक्षक आपलं तन-मन-धनांनी कार्य करत होते..
त्यावेळी आम्ही भरपूर मार ही खाल्लो, त्याच सोबतीला शाबासकीची थाप तितकीच महत्वाची आम्हाला मिळाली.त्याची किंमत कश्या बरोबर होऊच शकत नाही..
आमची शाळा पूर्ण पणे कामगार वसाहती मध्ये स्थायी आहे.तिथली बहुतांश कुटुंब तरी गरिबीचे चटके भोगत, रोजचं जगणं जगत आहेत, त्यातच इथल्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांनसोबतच पालकांचेही मन परिवर्तन करून विविध समाजोपयोगी उपकर्मे राबविल्या जातात...
खरंच कौतुक करावं तितकं कमी आहे,आजही हक्काचं स्थान म्हणून आम्ही सारी मित्रमंडळी शाळा आणि शाळातील प्रत्येक शिक्षकांकडे पाहतो..
#Great_teachers_make_grete_students
______________________✍️बसव
9604045418 / 8668306654
Comments
Post a Comment