फक्त त्यात आड यायची ती म्हणजे सकाळी 11 ते संध्याकाळी 5 दरम्यान एकाच रूम मध्ये 70-80 मुलांना कोंबून ठेवणारी शाळा , खड्या आवाजत गायलेलं राष्ट्रगीत, न सांगता सुट्टी घेतल्याची एखादी छडी, विशेष प्रसंगी धरलेले अंगठे, कविता पाठ नसताना ज्यानं बरोबर कविता म्हंटल त्याच्या हातानं स्वतःच्या गालावर उमटलेले चार बोट,एवढं होऊन सुद्धा "बस खाली माकडा" हे ऐकवणारे शाळेतील शिक्षक, जिथं जाताना त्या रामायणातील रामासारखं मी ही वनवासाला निगल्यागत वाटायचं......
____________________ ©बसव

Comments
Post a Comment