संस्कृती सोबत पर्यावरण ही तितकेच महत्वाचं... ! गणेशोत्सव उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. सगळीकडे नुसती लगबग सुरू झाली आहे. बाजारपेठ, फुलबाजार भरून आलेल्या आहेत . पर्यावरण जपणारी मंडळे तसेच वर्गणी न घेणारी मंडळे विविध संकल्पना लोकांसमोर मांडण्यासाठी उभी आहेत.अनेकांच्या घरामध्ये उत्साह तर शिगेला पोहचला आहे. वाढत चाललेल्या लोकसंख्याच आलेख आणि या अश्या उत्सवामध्ये सहभागी होणाऱ्या लोकांनी प्रत्येक उत्सवाचा एक नवीन इव्हेंटच बनत आहे. आणि अश्याच काही कारणांमुळे उत्सव उत्सव न राहता दिखाऊपणाचा एक इव्हेंट बनत चालला आहे. ह्यामुळे पर्यावरण सुद्धा तितकाच महत्वाचा भाग उत्सवामध्ये विचार करण्यासारखी गोष्ट बनत चालली आहे. प्रत्येकांना वाटत.., मीच का काळजी घेऊ..? आमच्याच सणाला हे असलं पर्यावरण वैगरे सुचतं का..? अशे प्रश्न विचारून ती गोष्ट टाळण्याचा प्रयत्न करत असतात... खरंच आपण थोडंस विचार करण्याची गरज आहे... ...
" जगावेगळं काम करायला सगळ्या जुन्या वाटा सोडायची आणि चौकटी मोडायची गरज नाही ..मनापासून जगता जगता अगदी सहज जगावेगळं काम होऊन जातं "