Skip to main content

पर्यावरण पुरक (इको फ्रेंडली)


     संस्कृती सोबत पर्यावरण ही तितकेच महत्वाचं... !

                

      गणेशोत्सव उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. सगळीकडे नुसती लगबग सुरू झाली आहे. बाजारपेठ, फुलबाजार भरून आलेल्या आहेत . पर्यावरण जपणारी मंडळे तसेच वर्गणी न घेणारी मंडळे विविध संकल्पना लोकांसमोर मांडण्यासाठी उभी आहेत.अनेकांच्या घरामध्ये उत्साह तर शिगेला पोहचला आहे.  
    वाढत चाललेल्या लोकसंख्याच आलेख आणि या अश्या उत्सवामध्ये सहभागी होणाऱ्या लोकांनी प्रत्येक उत्सवाचा एक नवीन इव्हेंटच बनत आहे. आणि अश्याच काही कारणांमुळे उत्सव उत्सव न राहता दिखाऊपणाचा एक इव्हेंट बनत चालला आहे. ह्यामुळे पर्यावरण सुद्धा तितकाच महत्वाचा भाग उत्सवामध्ये विचार करण्यासारखी गोष्ट बनत चालली आहे.
       प्रत्येकांना वाटत.., मीच का काळजी घेऊ..? आमच्याच सणाला हे असलं पर्यावरण वैगरे सुचतं का..? अशे प्रश्न विचारून ती गोष्ट टाळण्याचा प्रयत्न करत असतात...
खरंच आपण थोडंस विचार करण्याची गरज आहे...
     संस्कृती सोबत पर्यावरणाची ऱ्हास होऊ नये म्हणून आपल्यालाच एक पाऊल उचलण्याची गरज आहे...
    बाजारात सहजतेने उपलब्ध होणारे प्लास्टर ऑफ पॅरिस च्या गणेशमूर्ती नदीपात्रात विसर्जन करून पाणी प्रदूषित करण्यापेक्षा शाडूची मूर्ती पूजन नंतर कृत्रिम तलावात विसर्जन करण ही काळाची गरज आहे. पारंपारिक शाडूच्या मूर्ती एवजी प्लास्टर ऑफ पॅरिस च्या मूर्ती वापरून त्याच सोबतीला सजावटीसाठी थर्मोकोल किव्हा प्लॅस्टिकजन्य वस्तूंचा अति वापर, घातक रासायनिक रंगांचा मिश्रण ह्यामुळें जलप्रदूषणही मोठ्या प्रमाणावर होतं आहे.

    लाखों गणेशमूर्ती  पाण्यात न विरघळलेल्या व भग्न अवस्थेत बघून खऱ्या गणेशभक्ताच मन दुखावल्या वाचून राहणार नाही. त्यामुळे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तीमुळे होणारा पर्यावरणाचा ऱ्हास व गणेशमूर्तीची विटंबना थांबविण्यासाठी प्रत्येकाने शाडूमातीच्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करायला हवी.
मातीच्या बनवलेल्या मूर्ती पर्यावरणाला हानी पोहचवत नाही,तसेच ती मूर्ती पाण्यामध्ये लवकर विरघळतात. त्यांना लावण्यात येणारे रंग हे ही नैसर्गिक रित्या बनविल्या गेल्याने त्याचीही कोणतीही हानी निसर्गाला होत नाही.
     विसर्जनाचं म्हंटल तर शाडूच्या मातीची मूर्ती तुम्ही घरच्या घरी बादलीमध्ये सुद्धा विसर्जित करू शकता.ह्यामुळे बाप्पाच्या मूर्ती ची विटंबना टळेल व पर्यावरण पण सुरक्षित राहील.
     शेवटी हा निर्णय तुमचा आहे. सगळ्यांना अगणित आनंद देणाऱ्या गणेशोत्सवाच्या, बुद्धी देवतेच्या हार्दिक शुभेच्छा!.. .........✍️बसव
9604045418/ 8668306654

Comments

Popular posts from this blog

बालपण खूप सुखाचं होतं....!

फक्त त्यात आड यायची ती म्हणजे सकाळी 11 ते संध्याकाळी 5 दरम्यान एकाच रूम मध्ये 70-80 मुलांना कोंबून ठेवणारी शाळा , खड्या आवाजत गायलेलं राष्ट्रगीत, न सांगता सुट्टी घेतल्याची एखादी छडी, विशेष प्रसंगी धरलेले अंगठे, कविता पाठ नसताना ज्यानं बरोबर कविता म्हंटल त्याच्या हातानं स्वतःच्या गालावर उमटलेले चार बोट,एवढं होऊन सुद्धा "बस खाली माकडा" हे ऐकवणारे शाळेतील शिक्षक, जिथं जाताना त्या रामायणातील रामासारखं मी ही वनवासाला निगल्यागत वाटायचं...... ____________________ ©बसव

पुन्हा तेच...!

    "लोकासंगें ब्रम्हज्ञान आपण मात्र कोरडा पाषाण" अशी गत आपल्या समाजाची झाली आहे. फेसबुक व्हाट्सप वर वर्षभर पर्यावरण संबंधित बोधक विचार फिरवत राहायचं, पण प्रत्यक्ष कृती करण्याची वेळ आली की त्या विचारला नाकारून पुन्हा तेच करत रहायचं...       वर्षभर पाण्यासाठी अविरत प्रयत्न करत राहायचं,लोकांना पाणी पाचवा पाणी जिरवा अशी संकल्पना सांगत सुटायचं., वृक्षारोपण करणे, गाळ काढणे, चरे खोदणे, जलसंधारणाची कामे करणे, शेतात विहिरी खोदणे, बोर मारून घेणे असे नानाविध अट्टाहास त्या पाण्यासाठी करत असतो.. पण प्रत्यक्ष पाणी उपलब्ध झालं की हे असं होतं..       भर उन्हाळ्यात लोकांची पाण्यासाठी वणवण पाहवत नाही, विहिरी कोरड्या पडलेल्या दिसतात, कित्येक गावात  टँकर ने पाणी शासनानेच पोचवाव असं गावकऱ्यांच म्हणणं असतं.  नद्यांचा मध्यातील दगड सुद्धा त्यादिवसात चमकत असतो, त्या दिवसात पाण्याची गरज अधिकच भासते आणि आपल्या जवळील पाणी संपले याची भावना फक्त त्याच दिवसात येते..       संस्कृती टिकणे खरंच गरजेचे आहे, पण संस्कृती टिकवायची झाल्यास त्याच संस्कृत...

शाळेतील आठवणी आणि संध्याकाळीची मस्त मेजवानी...!

      बालपण, शाळा, शाळेतील मित्रमंडळी, शाळेतील शिक्षक अश्या ह्यांना त्या गोष्टी आजही आठवलं की मनमुराद जगलेले प्रत्येक क्षण आठवतात. डोळ्यासमोर पुन्हा सगळं बालपण उभं राहतं, आता वेळ निघून गेलं आहे पुन्हा ते क्षण जगता येणार नाही माहिती असून सुद्धा पण त्या आठवणी त्या मित्रमंडळी भेटले की पुन्हा  बालपण डोळ्यासमोर उभा राहतो.     अशीच बालपण आणि शाळातील आठवणीनं दिवसभरात दररोज विविध कारणाने येत असतात .पण आज अचानक अनपेक्षित पल्लवीचा फोन आला होय तिचा फोन अनपेक्षित होत. पण सुरुवातिला तीच म्हणाली, वर्गातील इतर कोणाचे फोन आला होतं का ..? हा प्रश्नांतर क्षणभर माझ्या डोक्यात विविध विचार येऊन गेले होते कारण दिवसभरात एकाही वर्गमित्राचा फोन अथवा sms आला नव्हतं.   नंतर तीच म्हणाली की 'आज सगळ्याना आपल्याला भेटायचं आहे नियोजन सगळं झालं आहे' 6 वाजता आठवणीनं "पक्का सोलापूर" हॉटेल ला ये.     एवढं बोलून तीन फोन कट केलं पण माझी धावपळ होऊ लागली आधी दिवसभराच्या नियोजनात हे काही प्लॅन नव्हतं तरीही सारे मित्रमैत्रिणी येणार म्हंटल्यावर मीही सगळं पुढील प्लॅन कॅन्सल करून स...