खूप दिवसांनी विचार करत होतो की काही तरी लिहावं, मनसोक्त बोलावं, खरं खोटं जे काही असेल ते आधी स्वतःला तरी सांगून बघावं, बघू विश्वास पटतो का....? म्हणून सुरुवात केली....!माझं नाव बसवराज नावात तस काही वेगळं महत्व सांगावं असं काही नाही... तरी नाव फक्त एक ओळख आणि त्या शाळेच्या नोंदणीत लागून राहिली... प्राथमिक शिक्षण विवेकानंद शाळेत आणि नेताजी सुभाषचंद्र बोस हायस्कुल मध्ये माझं ssc पूर्ण झालं.
प्राथमिक शाळा विवेकानंद तशी खूप लहान होती..जी त्या काळात म्हणजे आम्हाला तशी खूपच मोठी वाटत होती.. तिथले शिक्षक, कर्मचारी, मित्र बहुतेक तरी अजून आठवणीत आहेत आणि अधूनमधून भेट होत असते.शाळा लहान शाळेतील पट संख्या सुद्धा कमी त्यामुळे विद्यार्थी व शिक्षक यांची ओळख परिपूर्ण होतं असे.. त्यात मी अधीकच हुशार नेहमी शाळेत नंबर, इतर कलागुणांत सुद्धा तरबेज ह्यामुळे शाळेतील प्रत्येक शिक्षक देखील मला जवळून ओळखत होते....
प्राथमिक शिक्षण संपवून हायस्कूल साठी नेताजी सुभाषचंद्र बोस हायस्कुल मध्ये आईवडिलांनी प्रवेश करून दिला खरा पण तिथली विद्यार्थ्यांची संख्या पाहून मी मात्र भारावून गेलो. पूर्व भागातील सर्वात मोठी शाळा म्हणून नावाजलेली होती. प्रत्येक विषयाला एक-एक शिक्षक हे तेथे येऊन मला उमजल, बाकी शिक्षण सुरळीत चालू होतं एरवी शाळेत नंबर येणार मी वर्गात सुद्धा नंबर आणण कठीण होत गेलं, पुढे पुढे कसं बस ssc त्याच शाळेत झालं, आणि मनात कॉलेज जीवनातील वाऱ्यानी प्रवेश केला.
कमी टक्केवारी असताना सुद्धा मी खूप अपेक्षेने सर्वांच्या विरोधात जाऊन Science ला ऍडमिशन घेतलो... कुचन कॉलेज तसा शालेय रीतिरिवाज प्रमाणे चालणारी कॉलेज होतं. नियम अटी लागू असं आधीच ठरलेलं. जे पिक्चर मध्ये बघतो तसा कॉलेज काही केल्या आमच्या नशिबात नव्हतं.. पण तस सगळं सुरळीत चालू होतं...
कॉलेज सोबतच मनातही तरुणाईचे झरे वाहत होते जे पुढे जाऊन प्रेमाच्या गावात पोहचले.. मी ही इतर मुलं जस प्रेमात पडतात तसाच मी ही पडलो तिथंच जीवनात बदल घडणाऱ्या घटना आणि मला हव्या असणाऱ्या घटना ह्यांचा प्रत्यक्ष संबंध नसल्यासारखे सगळे घटना घडू लागले..., एकतर्फी प्रेम होतं.. त्यातच मला फोटोग्राफीची वेड लागली जी आयुष्यातील एक आमूलाग्र बदल म्हणून मी आजही स्वीकारलेलो आहे....!
तिच्या प्रेमातुन तिच्या नाकाराने मी मुक्त झालो पण फोटोग्राफी च्या बेडीत मात्र मी कायमचा अडकून गेलो.. त्यात माझे 12 वी बोर्डात नापास नावाचा डाग सर्व नातलगांना एक चर्चेचा विषय ठरला.. पुढे जाऊन ह्यातच म्हणजे फोटोग्राफीच्या क्षेत्रात काम करण्याचा निर्धार करून सात रस्ता येथे नामांकित अश्या झिंगाडे फोटो स्टुडिओ येथे फोटोग्राफी शिक्षण घेऊ लागलो जिथून माझी प्रगती सर्वांना दिसून आली... स्वप्नील सर -आनंद सर यांनी मला फोटोग्राफी ची शिक्षण दिल्या नंतर त्यांच्याच स्टुडिओ मध्ये मी माझं काम सुरू ठेवलो. जिथे मला खूप चांगल्या अनुभवांना सामोरे जावं लागलं..तिथून पुन्हा बाहेर पडून स्वतःचा स्टुडिओ सुरू करण्याचा अट्टहास केला खरा पण तो ही मी खूप दिवस टिकवू शकलो नाही ... स्वतःचा स्टुडिओ सुरू केल्या नंतर खूप चांगल्या प्रकारे माझा उदयोग आणि कला सर्वांना आवडू लागली, त्यातच पुन्हा मी माझा मार्ग सामाजिक क्षेत्रात वळवला.... जे आजतागायत निरंतर सुरू आहे...
फोटोग्राफी व्यवसाय जरी बंद केलो असलो तरी माझ्या फोटोग्राफी चे स्तुती करणारे आजही आहेत..
सामाजिक क्षेत्रात खूपच आवड निर्माण होतं गेली..विविध विषयांवर काम करण्यास प्रेरित होऊ लागलो.....विविध प्रकारच्या लोकांचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष संपर्क वाढत चाली होती. त्यांतच सामाजिक क्षेत्रात पद, प्रतिष्ठा प्रसिद्धी याचे वारे वाहत होते त्यात गुंता होण्या अगोदर मी स्नेहग्राम या सामाजिक प्रकल्पावर येऊन स्थायिक झालो.. बार्शी जवळ लोक वस्तीपासून लांब माळरानावर हा प्रकल्प म्हणजे वंचित आणि निराधारांची शाळा आहे त्यात महेश दादा आणि विनया ताई यांच्या कार्य कौतुकास्पद तर आहे त्याचबरोबर तेवढंच चॅलेंजिग काम आहे आज मी ते ठाम पणे सांगू शकतो...
हे असं चांगल्या लोकांच्या संपर्कातून आणि चांगल्या लोकांच्या प्रेरणेंतून माझी घडण होत गेली ज्यात मी खूप काही शिकतं आहे...
_____बसव (बसवराज जमखंडी)
9604045418 / 8668306654

Comments
Post a Comment