अशीच बालपण आणि शाळातील आठवणीनं दिवसभरात दररोज विविध कारणाने येत असतात .पण आज अचानक अनपेक्षित पल्लवीचा फोन आला होय तिचा फोन अनपेक्षित होत. पण सुरुवातिला तीच म्हणाली,
वर्गातील इतर कोणाचे फोन आला होतं का ..?
हा प्रश्नांतर क्षणभर माझ्या डोक्यात विविध विचार येऊन गेले होते कारण दिवसभरात एकाही वर्गमित्राचा फोन अथवा sms आला नव्हतं.
नंतर तीच म्हणाली की 'आज सगळ्याना आपल्याला भेटायचं आहे नियोजन सगळं झालं आहे' 6 वाजता आठवणीनं "पक्का सोलापूर" हॉटेल ला ये.
एवढं बोलून तीन फोन कट केलं पण माझी धावपळ होऊ लागली आधी दिवसभराच्या नियोजनात हे काही प्लॅन नव्हतं तरीही सारे मित्रमैत्रिणी येणार म्हंटल्यावर मीही सगळं पुढील प्लॅन कॅन्सल करून सगळ्याना भेटण्याच्या उत्सुकतेने सर्वात आधी हॉटेल समोर जाऊन थांबलो.
होय आजची उत्सुकता वेगळी होती आम्ही सारे मित्र तर कायम ह्यांना त्या कारणाने भेटत असतो, पण तब्बल 10 वर्षांनी वर्गातील मैत्रणी भेटणार होते. कश्या असतील त्या सारे..?,लग्न झालं असेल का.?,सोबत लहान मुलं वैगरे असेल का..? आता त्यांच्या सोबत त्यांचे पतीदेव देखील येत असतील का ...अश्या विविध प्रश्न समोर असतानाच समोरून पल्लवी कोंडी, वर्षा बसुदे,बालमणी दिकोंडा आदी समोर आल्यावर आधी। मला ह्यांचे नाव आठवत नव्हते नंतर गप्पामधून सार्यांनी आपली ओळख करून दिलं आधी पडलेल्या प्रश्नाचे उत्तर हळू हळू कळू लागलं,लग्न झालं होतं त्यांचं सोबत एक-एक गोंडस लहान मुलं देखील होतं.
कौतूक वाटतं होतं ह्या सर्वांना पाहून आज कारण शाळेत असताना छोट्या छोट्या गोष्टीसाठी भांडणारी ही सारे आज स्वतःच्या संसाराचा गाढा ओढत आहेत, स्वतःसोबत दोन कुटुंबाची धुरा संभाळत आहेत.आनंद वाटत होतं ह्यांच्याशी बोलताना.
गप्पा सुरूच होत्या तोवर इतर देखील मित्रमंडळी आल्या होत्या, सगळ्यांसोबत मनसोक्त गप्पा आणि सोबत मस्त जेवणाची मेजवानी सुरू होती, पुन्हा शाळातील त्या बेंचवरील, शाळेच्या मैदानातील आठवणीने जेवणाचा प्रत्येक घास गोड वाटतं होत, काहींना शाळेतील ते शिक्षक आठवत होते ते काहींना न आलेल्या एखाद्या मित्रांचे बाबतीत घडलेला एखादा किस्सा आठवतं होतं. खूप हसत होतो, मनसोक्त मनमुराद प्रत्येक गोष्टीला आठवणीला पुन्हा पुन्हा समोर मांडून त्या बालपणाला पुन्हा जागवत होतो.
अधून मधून एखाद दुसर सेल्फी/फोटो यातून हेही क्षण साठवून ठेवत होतो.उशीर झाला होतं पण हे सगळं मित्रमंडळी ना सोडून जायचं मन कुणाच होत नव्हतं.पुन्हा कधी भेटायचं रे हेही प्रश्न प्रत्येकाना पडला होता.
चला निघुया म्हणालो खरं आहे पण पाय उचलणं पुढं टाकणं सगळ्याना जड जात होतं, आम्हा मुलाना हिम्मत होती थांबायची,वेळ घालवायची पण त्या मुलींना सॉरी मुली नव्हत्या त्या आता कारण त्या आता आई, पत्नी,सून,आदर्श मुलगी अश्या सर्व रोल त्यांना पार पाडत पुढील आयुष्य जगायचं होत त्यामुळे उशीर होतोय समजून सगळे परत लवकर भेटू म्हणून आपापल्या घरी परतलो.....
खरंच बालपण आणि त्या बालपणातील शाळातील प्रत्येक क्षण पुन्हा पुन्हा अनुभवण्यासाठी पुन्हा पुन्हा अशी भेट होत रहायला पाहिजे...!
----------- ©बसव ब्लॉग
बसवराज जमखंडी- 9604045418

Comments
Post a Comment