Skip to main content

Posts

शाळेतील आठवणी आणि संध्याकाळीची मस्त मेजवानी...!

      बालपण, शाळा, शाळेतील मित्रमंडळी, शाळेतील शिक्षक अश्या ह्यांना त्या गोष्टी आजही आठवलं की मनमुराद जगलेले प्रत्येक क्षण आठवतात. डोळ्यासमोर पुन्हा सगळं बालपण उभं राहतं, आता वेळ निघून गेलं आहे पुन्हा ते क्षण जगता येणार नाही माहिती असून सुद्धा पण त्या आठवणी त्या मित्रमंडळी भेटले की पुन्हा  बालपण डोळ्यासमोर उभा राहतो.     अशीच बालपण आणि शाळातील आठवणीनं दिवसभरात दररोज विविध कारणाने येत असतात .पण आज अचानक अनपेक्षित पल्लवीचा फोन आला होय तिचा फोन अनपेक्षित होत. पण सुरुवातिला तीच म्हणाली, वर्गातील इतर कोणाचे फोन आला होतं का ..? हा प्रश्नांतर क्षणभर माझ्या डोक्यात विविध विचार येऊन गेले होते कारण दिवसभरात एकाही वर्गमित्राचा फोन अथवा sms आला नव्हतं.   नंतर तीच म्हणाली की 'आज सगळ्याना आपल्याला भेटायचं आहे नियोजन सगळं झालं आहे' 6 वाजता आठवणीनं "पक्का सोलापूर" हॉटेल ला ये.     एवढं बोलून तीन फोन कट केलं पण माझी धावपळ होऊ लागली आधी दिवसभराच्या नियोजनात हे काही प्लॅन नव्हतं तरीही सारे मित्रमैत्रिणी येणार म्हंटल्यावर मीही सगळं पुढील प्लॅन कॅन्सल करून स...
Recent posts

बालपण खूप सुखाचं होतं....!

फक्त त्यात आड यायची ती म्हणजे सकाळी 11 ते संध्याकाळी 5 दरम्यान एकाच रूम मध्ये 70-80 मुलांना कोंबून ठेवणारी शाळा , खड्या आवाजत गायलेलं राष्ट्रगीत, न सांगता सुट्टी घेतल्याची एखादी छडी, विशेष प्रसंगी धरलेले अंगठे, कविता पाठ नसताना ज्यानं बरोबर कविता म्हंटल त्याच्या हातानं स्वतःच्या गालावर उमटलेले चार बोट,एवढं होऊन सुद्धा "बस खाली माकडा" हे ऐकवणारे शाळेतील शिक्षक, जिथं जाताना त्या रामायणातील रामासारखं मी ही वनवासाला निगल्यागत वाटायचं...... ____________________ ©बसव

माझं सोलापूर

      माझं सोलापूर म्हंटल की नेहमी गजबजलेला गाव म्हणून ओळखला जातो, इथं पावला पावलावर बदल दिसतील व इथे आलेला प्रत्येक जण ह्या सोलापूरची ओळख नेहमीच त्यांच्या बोलण्यातून वेगवेगळ्या पद्धतीने मांडताना दिसतील.        12 व्या शतकात सोनलगी नंतर गिरणगाव आणि सोळा गावांनी बनलेलं सोळापूर व आता त्याचे नाव सोलापूर खरंच अभिमान वाटेल असा हा माझा सोलापूर.       इथं नेहमी मला आपुलकीची जाणीव दिसते.गाव जरी सोडून कोणी गेला तरी ह्या गावचे आठवणी प्रत्येकजणांच्या आठवणीत राहील असा हा माझा सोलापूर....बसव        इथं मला आवर्जून उल्लेख करावासा वाटतो तो म्हणजे इथं समाज सेवेची वेड असणारे माणस तुम्हला सर्वत्र दिसतील,काही जण वंचित घटकांच्या पुनर्वसनासाठी काम करत आहेत,तर काही त्याच्या शिक्षणाची जबाबदारी घेत आहेत, काहींनी तर सोलापूरला स्वच्छ पाणी मिळावं यासाठी आपलं घरदार रस्त्यावर आणलं, पर्यावरण संवर्धन,वृक्ष लागवड ह्यासाठी तर संपूर्ण सोलापूर नेहमीच तयार असलेला दिसतो,मूक प्राण्यांसाठी काम करणारे सुद्धा ...

चॉकलेट सिस्टर...अर्चना ताई

         रूपा ताईच्या घरी कलासंगमच्या संस्थापिका शोभा ताई बनशेट्टी यांची महापौर पदी म निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यासाठी एकत्र जमायचं ठरलं होतं, आम्ही सारे त्यांना आंटीच म्हणत आलोय, कोण कोण येणार याची चर्चा रांगोळीच्या दिवशी आणि दोन दिवस झालं त्या व्हाट्सएपच्या ग्रुपवर देखील चालू होतं, नवीनच ग्रुप तयार झाला होता त्यामुळे ग्रुप मधील मंडळी ही नवीन नंबर सेव्ह नसल्याने फक्त बोलायचं म्हणून बोलत होतो, कोण  काय  प्रश्न टाकत होते हे मात्र कळत नव्हतं काहींनी तर पार्टी तर काहीं आईस्क्रीम ची ऑर्डर तर काहींना पाणी पुरीची हौस तर काहींनी आपलं विचार करूनच फक्त चॉकलेट वर समाधान म्हणाले तर कित्येकांनी देऊ की म्हणाले आणि मी ही कोणीतरी चॉकलेट मागितलय म्हणून मी पुढचा मागचा विचार न करता देतो की उद्या भेटल्यावर असं ग्रुप वर sms केलो.           मी नेहमीसारखा लवकरच येवून पोचलो होतो, काहीजण जमले होते तर आणखी काहींना यायला उशीर होता, मी अजून तसा ह्या ग्रुप मध्ये नवीनच होतो, पण रांगोळीच्या मध्ये घातलेली धांदली मुळे मी सगळ्यांच्या जवळचा झालो होतो सगळेच ...

प्रवास...... शिलालेखाच्या शोधात.

        मी आणि नितीन सर ठरल्याप्रमाणे पहाटे 6वाजताच सोलापूर मधून आमची गाडी घेऊन पंढरपूर मार्गे निघालो...     सगळीकडे पाऊस पडला होता त्यामुळे रोडच्या कडेला सगळं हिरवी शाल पांघरलेली जमीन नेहमीपेक्षा अधिक सूंदर दिसत होती, थंड हवा अंगाला स्पर्श करून जात होता, सुर्यची किरणे अजून तितकी प्रखर नसल्याने प्रवास आल्हाददायक वाटत होतं.. वाटेत क्षणभर थांबून घेतलेला चहाचा घोट त्या प्रवासाला गोडवा निर्माण करत होती.     गाव आणि गाव संस्कृती नष्ट होत आहे असं खूप ठिकाणी ऐकलं असताना, आम्हाला बहुतांश गावाच्या वेशीत प्रवेश करण्यागोदरच वेशीला लागूनच असलेला जी.प प्राथमिक शाळेतील शिक्षिकेचा आवाज आणि त्याच सोबतीला त्यांच्या सुरात सूर मिसळून खड्या आवाजात गाणारी चिमुकल्या मुलांचा आवाज गावच्या समृद्धीची साक्ष देताना दिसत होती. तर काहि गावात प्रवेश करताच पारावर बसलेली वृद्ध आमच्या कडे पाहत काही कुजबुजत होती, आम्ही ही आधी त्याच लोकांच्या जवळ जाऊन नमस्कार करणार त्यांचंही राम-राम आमच्यासाठी इनर्जी होती. स्वतःबद्दल थोढीशी माहिती सांगताना त्यांच्या नजरा उंचाव...

पुन्हा तेच...!

    "लोकासंगें ब्रम्हज्ञान आपण मात्र कोरडा पाषाण" अशी गत आपल्या समाजाची झाली आहे. फेसबुक व्हाट्सप वर वर्षभर पर्यावरण संबंधित बोधक विचार फिरवत राहायचं, पण प्रत्यक्ष कृती करण्याची वेळ आली की त्या विचारला नाकारून पुन्हा तेच करत रहायचं...       वर्षभर पाण्यासाठी अविरत प्रयत्न करत राहायचं,लोकांना पाणी पाचवा पाणी जिरवा अशी संकल्पना सांगत सुटायचं., वृक्षारोपण करणे, गाळ काढणे, चरे खोदणे, जलसंधारणाची कामे करणे, शेतात विहिरी खोदणे, बोर मारून घेणे असे नानाविध अट्टाहास त्या पाण्यासाठी करत असतो.. पण प्रत्यक्ष पाणी उपलब्ध झालं की हे असं होतं..       भर उन्हाळ्यात लोकांची पाण्यासाठी वणवण पाहवत नाही, विहिरी कोरड्या पडलेल्या दिसतात, कित्येक गावात  टँकर ने पाणी शासनानेच पोचवाव असं गावकऱ्यांच म्हणणं असतं.  नद्यांचा मध्यातील दगड सुद्धा त्यादिवसात चमकत असतो, त्या दिवसात पाण्याची गरज अधिकच भासते आणि आपल्या जवळील पाणी संपले याची भावना फक्त त्याच दिवसात येते..       संस्कृती टिकणे खरंच गरजेचे आहे, पण संस्कृती टिकवायची झाल्यास त्याच संस्कृत...