आज १९ ऑगस्ट हा जागतिक छायाचित्र दिन म्हणून जगभरात उत्साहात साजरा केला जातो. जगभरातल्या फोटोग्राफर्सना प्रेरणा देणारा दिवस आहे. मोबाईलच्या युगानंतर फोटोग्राफी प्रत्येकाच्या हातात आली आहे.
माझा आणि ह्या कॅमेराचा संबंध 2011 साली मी जेव्हा घरच्यांचा विरोध करत Science ला ऍडमिशन घेतलं त्यानंतर अवघ्या काही महिन्यातच फोटोग्राफी ची वेढ लागून गेली..., फोटोग्राफीतल थोडंफार कळू लागलं तेव्हाच मी या फोटोग्राफी ला वाहून घ्यायचं ठरवलं.
त्याच माझ्या फोटोग्राफी वाटचाल आधी शिक्षण, नोकरी, व्यवसाय आणि आता तीच फोटोग्राफी मी छंद म्हणून जोपासतोय...
आता उच्चप्रतीच्या मोबाइल फोनमध्येच उत्कृष्ट फोटो काढायची व ते हवे तसे प्रोसेस करण्याची, शेअर करण्याची सोय झाली आहे.
फोटो काढणे इतके सोपे झाल्यामुळे आता उठता-बसता, सकाळ-संध्याकाळ किंवा प्रत्येक क्षणी फोटो काढले जाऊ लागले आहेत. फोटोच्या या भाऊगर्दीतही छायाचित्रणाची कला मेलेली नाही. लोक अजूनही कलात्मक, विचार करायला लावणारी छायाचित्रे काढतात. त्यामुळे छायाचित्रणाचे महत्त्व कायम आहे.
बदलत्या काळात आता प्रश्न आहे… पुढे काय असणार..?
...........✍️बसव

Comments
Post a Comment