Skip to main content

     सोशल मीडियाच्या आहारी आपण इतकं  गेलो आहे की  खरंखुरं आयुष्य जगणं विसरून गेलो आहोत.

     DP, स्टेटस, सेल्फी, ट्विट, हे शब्द काही वर्षांपूर्वी आमच्या आचरणात सुद्धा नव्हते,
आणि तो आपल्यातला कधी होऊन गेला हेही आठवत नाही. आपल्या व्यक्तिगत आयुष्यातल्या गोष्टी कुणाला सांगायच्या नसतात, हेही आपल्याला माहीत आहे, या शिकवणीतून घडलेली आपली पिढी अचानकपणे आज आपण काय करतोय, कोठे आहे, कोणासोबत आहे, कितिउशिर आहे हे सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळ्या जगाला ओरडून सांगत आहोत....
      सोशल मीडिया हे संवादाचं माध्यम आहे. दूर राहणारे नातेवाईक, संपर्कात नसणारी मित्रमंडळी या सगळ्यांना बांधून ठेवायला हे सोशल मीडिया उपयोगात येणार असं वाटल होत...
      पण आता ह्या सध्याच्या युवकांनी त्याची व्याख्या पूर्ण बदलून टाकली.
    खूप गोष्टी चांगल्या घडल्या खूप काही मनात भरून ठेवलेलं गुपित आज कित्येकजण वेगवेगळ्या माध्यमातून आपल्या समोर ते मांडत आहेत.
   ह्याच सोशल मीडियामुळे अनेकांना वाटू लागलं की आपण मोठे राजकारणी/हिरो/ हिरोईन/कलाकार/गायक/लेखक किंवा जगातलं इतरही बरेच काही आहोत. ह्यातूनच कित्येकांना आत्मविश्वास मिळत आहे.. ह्यामुळे लोकप्रियता ही खूप मिळते..
         पण हे सारं  क्षणभंगुर आहे,
सेल्फी घेताना जीव जात आहे, ह्या इंटरनेट   माध्यमातून लाखोंना गंडा घातला जात आहे,
काही संदेशमुळे आपल्यात राजकीय /सामाजिक /धार्मिक गोष्टीमध्ये वेगळाच वळण मिळतोय कित्येकजण त्याची सत्य न जाणता फॉरवर्ड करत असतात त्यामुळे कुणाचाही सहजपणे अपमान केला जात आहे, हे समजण्याआधी वणवा खूप लांब पर्यंत पोहचलेला असतो.
      सोशल मीडियामुळे आपल्याला आपल्या मनातला राग ,द्वेष ,आनंद निषेध व्यक्त करण्याचं साधन मिळाल आहे. या सोशल मीडियाचा हेतू लोकांना जवळ आणणं हा होता  पण आता तेच साधन लोकांच व्यसन बनत चालय, आणि कुठल्याही गोष्टीचं व्यसन हे वाईटच.
संपूर्ण जग ह्या फोनच्या आसपासच अडकून राहिलंय. थोडं चांगुलपणा बाळगलं तर त्याचा छान उपयोगही करून घेता येतो...
म्हणून एवढंच सांगेन की आपल्याला सोशल मीडियाच्या आहारी न जाता, खरंखुरं जगायला वेळ काढण्याचा प्रयत्न करायला हवं
.....बसव

Comments

Popular posts from this blog

बालपण खूप सुखाचं होतं....!

फक्त त्यात आड यायची ती म्हणजे सकाळी 11 ते संध्याकाळी 5 दरम्यान एकाच रूम मध्ये 70-80 मुलांना कोंबून ठेवणारी शाळा , खड्या आवाजत गायलेलं राष्ट्रगीत, न सांगता सुट्टी घेतल्याची एखादी छडी, विशेष प्रसंगी धरलेले अंगठे, कविता पाठ नसताना ज्यानं बरोबर कविता म्हंटल त्याच्या हातानं स्वतःच्या गालावर उमटलेले चार बोट,एवढं होऊन सुद्धा "बस खाली माकडा" हे ऐकवणारे शाळेतील शिक्षक, जिथं जाताना त्या रामायणातील रामासारखं मी ही वनवासाला निगल्यागत वाटायचं...... ____________________ ©बसव

पुन्हा तेच...!

    "लोकासंगें ब्रम्हज्ञान आपण मात्र कोरडा पाषाण" अशी गत आपल्या समाजाची झाली आहे. फेसबुक व्हाट्सप वर वर्षभर पर्यावरण संबंधित बोधक विचार फिरवत राहायचं, पण प्रत्यक्ष कृती करण्याची वेळ आली की त्या विचारला नाकारून पुन्हा तेच करत रहायचं...       वर्षभर पाण्यासाठी अविरत प्रयत्न करत राहायचं,लोकांना पाणी पाचवा पाणी जिरवा अशी संकल्पना सांगत सुटायचं., वृक्षारोपण करणे, गाळ काढणे, चरे खोदणे, जलसंधारणाची कामे करणे, शेतात विहिरी खोदणे, बोर मारून घेणे असे नानाविध अट्टाहास त्या पाण्यासाठी करत असतो.. पण प्रत्यक्ष पाणी उपलब्ध झालं की हे असं होतं..       भर उन्हाळ्यात लोकांची पाण्यासाठी वणवण पाहवत नाही, विहिरी कोरड्या पडलेल्या दिसतात, कित्येक गावात  टँकर ने पाणी शासनानेच पोचवाव असं गावकऱ्यांच म्हणणं असतं.  नद्यांचा मध्यातील दगड सुद्धा त्यादिवसात चमकत असतो, त्या दिवसात पाण्याची गरज अधिकच भासते आणि आपल्या जवळील पाणी संपले याची भावना फक्त त्याच दिवसात येते..       संस्कृती टिकणे खरंच गरजेचे आहे, पण संस्कृती टिकवायची झाल्यास त्याच संस्कृत...

शाळेतील आठवणी आणि संध्याकाळीची मस्त मेजवानी...!

      बालपण, शाळा, शाळेतील मित्रमंडळी, शाळेतील शिक्षक अश्या ह्यांना त्या गोष्टी आजही आठवलं की मनमुराद जगलेले प्रत्येक क्षण आठवतात. डोळ्यासमोर पुन्हा सगळं बालपण उभं राहतं, आता वेळ निघून गेलं आहे पुन्हा ते क्षण जगता येणार नाही माहिती असून सुद्धा पण त्या आठवणी त्या मित्रमंडळी भेटले की पुन्हा  बालपण डोळ्यासमोर उभा राहतो.     अशीच बालपण आणि शाळातील आठवणीनं दिवसभरात दररोज विविध कारणाने येत असतात .पण आज अचानक अनपेक्षित पल्लवीचा फोन आला होय तिचा फोन अनपेक्षित होत. पण सुरुवातिला तीच म्हणाली, वर्गातील इतर कोणाचे फोन आला होतं का ..? हा प्रश्नांतर क्षणभर माझ्या डोक्यात विविध विचार येऊन गेले होते कारण दिवसभरात एकाही वर्गमित्राचा फोन अथवा sms आला नव्हतं.   नंतर तीच म्हणाली की 'आज सगळ्याना आपल्याला भेटायचं आहे नियोजन सगळं झालं आहे' 6 वाजता आठवणीनं "पक्का सोलापूर" हॉटेल ला ये.     एवढं बोलून तीन फोन कट केलं पण माझी धावपळ होऊ लागली आधी दिवसभराच्या नियोजनात हे काही प्लॅन नव्हतं तरीही सारे मित्रमैत्रिणी येणार म्हंटल्यावर मीही सगळं पुढील प्लॅन कॅन्सल करून स...