Skip to main content

Posts

Showing posts with the label लेखन साहित्य
     सोशल मीडियाच्या आहारी आपण इतकं  गेलो आहे की  खरंखुरं आयुष्य जगणं विसरून गेलो आहोत.      DP, स्टेटस, सेल्फी, ट्विट, हे शब्द काही वर्षांपूर्वी आमच्या आचरणात सुद्धा नव्हते, आणि तो आपल्यातला कधी होऊन गेला हेही आठवत नाही. आपल्या व्यक्तिगत आयुष्यातल्या गोष्टी कुणाला सांगायच्या नसतात, हेही आपल्याला माहीत आहे, या शिकवणीतून घडलेली आपली पिढी अचानकपणे आज आपण काय करतोय, कोठे आहे, कोणासोबत आहे, कितिउशिर आहे हे सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळ्या जगाला ओरडून सांगत आहोत....       सोशल मीडिया हे संवादाचं माध्यम आहे. दूर राहणारे नातेवाईक, संपर्कात नसणारी मित्रमंडळी या सगळ्यांना बांधून ठेवायला हे सोशल मीडिया उपयोगात येणार असं वाटल होत...       पण आता ह्या सध्याच्या युवकांनी त्याची व्याख्या पूर्ण बदलून टाकली.     खूप गोष्टी चांगल्या घडल्या खूप काही मनात भरून ठेवलेलं गुपित आज कित्येकजण वेगवेगळ्या माध्यमातून आपल्या समोर ते मांडत आहेत.    ह्याच सोशल मीडियामुळे अनेकां...
*" हिंदवी परिवार"* या शब्दामध्ये परिवार हाच शब्द का वापरला गेला ह्याच उत्तर मला खूप वेळा मिळत नव्हतं आणि कोणाला विचारायची हिम्मत सुद्धा कधी झाली नाही. पण जसजसं हिंदवी परिवारासोबत जोडलो गेलो त्यांच्या राष्ट्रबांधणीच्या  काही कार्यात मला ही ते सामावून घेत होते,त्याचा मला सार्थ अभिमान आहे, तेव्हा "गुरुवर्य डॉ शिवरत्न" शेटे सरांनी आपल्या व्याख्यानातून हिंदवी परिवराबद्दल सांगत असताना ते म्हणत आम्ही राष्ट्र बांधणीसाठी हा परिवार निर्माण उभा करत आहोत. पण ह्याची प्रचीती मला ह्या वर्षीच्या पावसाळी मोहिमेत घडली हिंदवी परिवार आयोजित पन्हाळा ते पावनखिंड मोहिमेत गेल्या वर्षी प्रमाणे यंदाही मला सहभागी होण्याचे मिळाले. सोबत काही मित्र होते माझ्यासारखीच सर्वांची पैश्याची कटकट असल्याने प्रायव्हेट गाडी करून पन्हाळा पावनखिंड मोहीम करणे परवडत नसल्याने आम्ही सारे मित्र एक दिवस अगोदर कोल्हापूर गाठून तिथून दुसऱ्या दिवशी मोहिमेत सहभागी होण्याचे ठरवले. ठरवल्याप्रमाणे आम्ही सारे पन्हाळा येथे हिंदवी परिवाराच्या नियोजित वेळे नुसार गडावर पोचलो. डॉ शिवरत्न शेटे सरांचं व्याख्यान,प्...

Love success 💕 - एक छोटीशी लव्ह स्टोरी😘

       शाळेत वार्षिक क्रीडा सप्ताह चालू होते..शाळा पूर्ण त्या क्रीडा सप्ताहात दणाणून निघाली होती... आणि क्रीडा सप्ताह म्हणजे शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांच्या आवडीचा विषय कुठलेच तासिका होतं नव्हते..त्यामुळे अभ्यासाचा त्रास नाही, बोरींग तासिका नाही, आणि मूळ आनंद म्हणजे घरच्यांना सांगायला एक कारण होत की आज घरचा अभ्यास नाही त्यामुळे सगळीच अत्यंत आनंदच वातावरण ह्या क्रीडा सप्ताहात चालत असतं ...         हे सगळं असं चालू असतानाच त्या दिवशी सुद्धा क्रीडा सप्तहात कबड्डीचा खेळ सुरू होता आमच्या वर्गाचं मॅच अजून दोन मॅच नंतर होता..त्यामुळे आम्ही मैदानात इतरत्र विविध गोष्टी व विविध व्यक्ती न्हाहळत होतो.           मग आम्ही काही मित्र हे सगळं करत मैदानात एका कोपर्याला कट्यावर बसलो होतो काही वेळाने आम्हची मित्रांची सगळी गँग बाथरूम कडे वळाली.. सोबत तिथंच पडलेली काही मातीचे खडे हातात घेऊन पुढे फेकत निघालो होतो... क्षणातच एका मित्राला नवीनच कल्पना सुचली आणि तो जोरात ओरडला      "बाथरूमच्या फुटलेल्या खिडकीत जो कुणी इथून द...

वृक्षारोपण

आनंदी जगण्याचं एक साधन.. म्हणजे पर्यावरण रक्षण.....             काही ठिकाणी पाऊस पडत आहे तर काही ठिकाणी अजून तो जोम धरला नाही. हे दाटून आलेले ढग पाहता वाटते थोड्याच काळात तेही बरसतील .भरपुर व दमदार पाऊस होईल अशी आशा आहे.     यंदाच्या वर्षाचा वाढलेले तापमान पाहता पुढील भविष्यकाळ सुखाचा आणी समृद्धीचा जाण्यासाठी आपल्याला वृक्षारोपण आणि त्याच संवर्धन करायला शिकलं पाहिजे,     चला एक नवीन वसा हाती घेऊया, पावसाळ्याच्या या पाणीमय वातावरणात स्वतःच्या नावाने स्वतः एक रोपटे लावुया व त्याला जगवुया. आपल्या येणाऱ्या पिढीला देवु एक नवीन वारसा...... स्वच्छ संस्कृती सोबत हिरवाईने नटलेला भारत देशा...... __________________बसव