Skip to main content

अश्विनी ताई

   अश्विनी ताईनं माझ्या आणि तिच्या परवाच्या भेटी नंतर लिहिलेली कविता
         एका सामाजिक कार्यक्रमात जमखंडी सर कोठे आहेत म्हणून मलाच विचारून माझ्याशी जोडली गेलेली ताई आज माझा लहान भाऊ आहे हा म्हणून हक्काने जगाला सांगणारी हीच ती ताई..
           हेल्प लाईन नावच्या ग्रुप मधून संपर्कात आलो त्यानंतर ह्यां ना त्या कार्यक्रमात येऊ लागलो भेटू लागलो, ज्यामध्ये एकमेकांची नात जुळत गेलं आणि एक भाऊ बहिणीचं नात गुंफत गेला...
       एकमेकांच्या कार्याला धावून येण्यात दोघेही तत्पर होतो. मोठी ताई नाही पण अश्विनी ताई नेहमी मला माझ्या काळजी खातीर फोन करून जेवण कर,आराम कर,जास्त काम करू नकोस उन्हात फिरू नकोस,ह्या गोष्टी लहान भावा सारख सांगत असते, तेव्हा खरंच मला कधीकधी अभिमान वाटतो स्वतःचा की अशी माणसं मला भेटलेत की ज्यांची तुलना कोण बरोबर ही नाही होऊ शकत.
    एकदा मी आजारी पडलो होतो, तेव्हा तीनं  तिच्या पायात दुखापत असूनही मला हक्काने घरी येईन दवाखान्यात नेलं होतं, गोळ्या-औषध तर नंतर मिळालं पण ती आली माझ्यासाठी त्यातच अर्ध दुखणं बर झालं होतं.
 एकदा फेसबुक वर फोटो पोस्ट करताना त्या फोटो मधील माझा पडलेला चेहरा बघून माझ्या दुःखाच कारण विचारली तेव्हा मला न राहवलं  आणि नकळतपणे डोळे पाण्यानी ओले झाले ...
   रोज शहरात फिरताना दिवसातून एकदा तरी तिला भेटल्याशिवाय शहराच्या परिक्रमा पूर्ण होत नव्हत्या आणि ती मला दिवसातून एकदा तरी फोन केल्याशिवाय तिलाही मन करमत नव्हतं..असच आमचं रोजचं जगणं झालं होतं...
      पण गेल्या काही महिन्यांपासून सोलापूर सोडून स्नेहग्राम मध्ये राहतोय तिला ते अभिमानास्पद तर होतच पण तिला माझी आणि मला तिची उणिवा दररोज भासत होती..हे तिच्या आलेल्या प्रत्येक फोन मधून मला जाणवत होतं....परवा सोलापूर ला आल्यानंतर पुन्हा एकदा खूप दिवसांनी भेटलो मनसोक्त गप्पा मारल्या...गप्पा मारताना त्याच जुन्या आठवणी पुन्हा जागा झाल्या, मग पुन्हा निरोप घेताना,आठवणींचा एक सेल्फी घ्यावासा वाटला.....
तीच माझं काही रक्ताचं नात नाही पण आज तीच आणि माझं जे नकळतपणे बहीण भावासारखा नात निर्माण झालं आहे ते खरंच बहु मोलाचं असेल असं मला वाटत.
           धन्यवाद ताई
तूझी साथ माझ्यासोबत राहूदे कधी चुकलो तेव्हा सुद्धा हक्काने कान धरून मला त्याची जाणीव करून दे...
    तुझ्याच लहान भाऊ .....बसव

Comments

Popular posts from this blog

बालपण खूप सुखाचं होतं....!

फक्त त्यात आड यायची ती म्हणजे सकाळी 11 ते संध्याकाळी 5 दरम्यान एकाच रूम मध्ये 70-80 मुलांना कोंबून ठेवणारी शाळा , खड्या आवाजत गायलेलं राष्ट्रगीत, न सांगता सुट्टी घेतल्याची एखादी छडी, विशेष प्रसंगी धरलेले अंगठे, कविता पाठ नसताना ज्यानं बरोबर कविता म्हंटल त्याच्या हातानं स्वतःच्या गालावर उमटलेले चार बोट,एवढं होऊन सुद्धा "बस खाली माकडा" हे ऐकवणारे शाळेतील शिक्षक, जिथं जाताना त्या रामायणातील रामासारखं मी ही वनवासाला निगल्यागत वाटायचं...... ____________________ ©बसव

पुन्हा तेच...!

    "लोकासंगें ब्रम्हज्ञान आपण मात्र कोरडा पाषाण" अशी गत आपल्या समाजाची झाली आहे. फेसबुक व्हाट्सप वर वर्षभर पर्यावरण संबंधित बोधक विचार फिरवत राहायचं, पण प्रत्यक्ष कृती करण्याची वेळ आली की त्या विचारला नाकारून पुन्हा तेच करत रहायचं...       वर्षभर पाण्यासाठी अविरत प्रयत्न करत राहायचं,लोकांना पाणी पाचवा पाणी जिरवा अशी संकल्पना सांगत सुटायचं., वृक्षारोपण करणे, गाळ काढणे, चरे खोदणे, जलसंधारणाची कामे करणे, शेतात विहिरी खोदणे, बोर मारून घेणे असे नानाविध अट्टाहास त्या पाण्यासाठी करत असतो.. पण प्रत्यक्ष पाणी उपलब्ध झालं की हे असं होतं..       भर उन्हाळ्यात लोकांची पाण्यासाठी वणवण पाहवत नाही, विहिरी कोरड्या पडलेल्या दिसतात, कित्येक गावात  टँकर ने पाणी शासनानेच पोचवाव असं गावकऱ्यांच म्हणणं असतं.  नद्यांचा मध्यातील दगड सुद्धा त्यादिवसात चमकत असतो, त्या दिवसात पाण्याची गरज अधिकच भासते आणि आपल्या जवळील पाणी संपले याची भावना फक्त त्याच दिवसात येते..       संस्कृती टिकणे खरंच गरजेचे आहे, पण संस्कृती टिकवायची झाल्यास त्याच संस्कृत...

शाळेतील आठवणी आणि संध्याकाळीची मस्त मेजवानी...!

      बालपण, शाळा, शाळेतील मित्रमंडळी, शाळेतील शिक्षक अश्या ह्यांना त्या गोष्टी आजही आठवलं की मनमुराद जगलेले प्रत्येक क्षण आठवतात. डोळ्यासमोर पुन्हा सगळं बालपण उभं राहतं, आता वेळ निघून गेलं आहे पुन्हा ते क्षण जगता येणार नाही माहिती असून सुद्धा पण त्या आठवणी त्या मित्रमंडळी भेटले की पुन्हा  बालपण डोळ्यासमोर उभा राहतो.     अशीच बालपण आणि शाळातील आठवणीनं दिवसभरात दररोज विविध कारणाने येत असतात .पण आज अचानक अनपेक्षित पल्लवीचा फोन आला होय तिचा फोन अनपेक्षित होत. पण सुरुवातिला तीच म्हणाली, वर्गातील इतर कोणाचे फोन आला होतं का ..? हा प्रश्नांतर क्षणभर माझ्या डोक्यात विविध विचार येऊन गेले होते कारण दिवसभरात एकाही वर्गमित्राचा फोन अथवा sms आला नव्हतं.   नंतर तीच म्हणाली की 'आज सगळ्याना आपल्याला भेटायचं आहे नियोजन सगळं झालं आहे' 6 वाजता आठवणीनं "पक्का सोलापूर" हॉटेल ला ये.     एवढं बोलून तीन फोन कट केलं पण माझी धावपळ होऊ लागली आधी दिवसभराच्या नियोजनात हे काही प्लॅन नव्हतं तरीही सारे मित्रमैत्रिणी येणार म्हंटल्यावर मीही सगळं पुढील प्लॅन कॅन्सल करून स...