Skip to main content

माझं सोलापूर



      माझं सोलापूर म्हंटल की नेहमी गजबजलेला गाव म्हणून ओळखला जातो, इथं पावला पावलावर बदल दिसतील व इथे आलेला प्रत्येक जण ह्या सोलापूरची ओळख नेहमीच त्यांच्या बोलण्यातून वेगवेगळ्या पद्धतीने मांडताना दिसतील.
       12 व्या शतकात सोनलगी नंतर गिरणगाव आणि सोळा गावांनी बनलेलं सोळापूर व आता त्याचे नाव सोलापूर खरंच अभिमान वाटेल असा हा माझा सोलापूर.
      इथं नेहमी मला आपुलकीची जाणीव दिसते.गाव जरी सोडून कोणी गेला तरी ह्या गावचे आठवणी प्रत्येकजणांच्या आठवणीत राहील असा हा माझा सोलापूर....बसव
       इथं मला आवर्जून उल्लेख करावासा वाटतो तो म्हणजे इथं समाज सेवेची वेड असणारे माणस तुम्हला सर्वत्र दिसतील,काही जण वंचित घटकांच्या पुनर्वसनासाठी काम करत आहेत,तर काही त्याच्या शिक्षणाची जबाबदारी घेत आहेत, काहींनी तर सोलापूरला स्वच्छ पाणी मिळावं यासाठी आपलं घरदार रस्त्यावर आणलं, पर्यावरण संवर्धन,वृक्ष लागवड ह्यासाठी तर संपूर्ण सोलापूर नेहमीच तयार असलेला दिसतो,मूक प्राण्यांसाठी काम करणारे सुद्धा तितकेच आहेत,आपल्या कलेच्या माध्यमातून जगभर सोलापूरचा नाव उंचावणारे सुद्धा आज सोलापूरातच आहेत, सोलापूरच्या इतिहास लोकांसमोर आणण्यासाठी आजही काही जण आपलं मौल्यवान वेळ देत आहेत,काहीजण उद्योग क्षेत्रात सोलापूरचा झेंडा जगभर उमठवत आहे. काही जण आपल्या लेखणीतून सोलापूरचे महत्व जगासमोर मांडत आहेत,स्वच्छतेची जागरूकता ही आजच्या सोलापुरात राहावी म्हणून झटणारे सुध्दा आपल्याला पाहायला मिळतील, इथे सोलापूर मध्ये कोणी भुकेला पोटी झोपू नये यासाठी आजही युवक-युवती आपला जागरण करत आहेत, आरोग्य क्षेत्रात सुद्धा सोलापूरने आपलं वर्चस्व टिकून ठेवली आहे.
      आज सोलापूरमध्ये खूप सारे सामाजिक संघटना, संस्था कुठल्याही अपेक्षा न करता कुठल्याही चुकीच्या गोष्टीला बळी न पडता आपलं काम मनापासून ह्या समाजासाठी ह्या आपल्या सोलापूरसाठी झटत आहेत.
   सिद्धेश्वर जत्रेच महत्व आजही खूप जण जाणून घेण्यासाठी ह्या जत्रेत आवर्जून सहभागी होतात. मिल जरी बंद पडल्यातरी कितीही दुष्काळ जरी आलं तरी जगभर ह्या सोलापुरी चादर त्याची ख्याती कमी होऊ दिली नाही. बहुभाषिक असलेल्या हा सोलापूर सर्व जातीय सर्व समाजातील लोकांना एकत्र घेऊन गुण्यागोविंदाने राहत आहेत,दररोज एक सण उत्सवानी हा सोलापुर नव्या नवख्या वधू प्रमाणे दररोज नटला जात आहे.
    इतिहासाचे पाने चाळली तर पावलापावलावर सोलापूरचा उल्लेख तुम्हला दिसून येईल, दिल्ली चे ही तख्त राखतो सोलापूर माझा अस खरंच म्हणण्याची वेळ आता आपल्यावर आली आहे.सोलापूरच्या भरवश्यावर आजही देश्याचा कारभार चालू आहे ह्याच कारण अस की आजही कित्येक महत्वाची पदे सोलापूरच्या नागरिकांच्या वाटेला आली आहे.
    अनेक संकटे झेलत दुष्काळावर मात करत राजकारण्यांचे राजकारण डावलून सोलापूर आजही ह्या देशाच्या नकाशावर व जगाच्या पाठीवर वेगळी ओळख माझा सोलापूर निर्माण करत आहे.
    त्यामुळे खरंच मला माझ्या सोलापूरचा अभिमान आहे.
____________@✍️#बसव
📱9604045418 /8668306654

Comments

  1. आपल्या लेखणीने सोलापूरचा असल्याचा अभिमानात भर पडतेय

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

बालपण खूप सुखाचं होतं....!

फक्त त्यात आड यायची ती म्हणजे सकाळी 11 ते संध्याकाळी 5 दरम्यान एकाच रूम मध्ये 70-80 मुलांना कोंबून ठेवणारी शाळा , खड्या आवाजत गायलेलं राष्ट्रगीत, न सांगता सुट्टी घेतल्याची एखादी छडी, विशेष प्रसंगी धरलेले अंगठे, कविता पाठ नसताना ज्यानं बरोबर कविता म्हंटल त्याच्या हातानं स्वतःच्या गालावर उमटलेले चार बोट,एवढं होऊन सुद्धा "बस खाली माकडा" हे ऐकवणारे शाळेतील शिक्षक, जिथं जाताना त्या रामायणातील रामासारखं मी ही वनवासाला निगल्यागत वाटायचं...... ____________________ ©बसव

पुन्हा तेच...!

    "लोकासंगें ब्रम्हज्ञान आपण मात्र कोरडा पाषाण" अशी गत आपल्या समाजाची झाली आहे. फेसबुक व्हाट्सप वर वर्षभर पर्यावरण संबंधित बोधक विचार फिरवत राहायचं, पण प्रत्यक्ष कृती करण्याची वेळ आली की त्या विचारला नाकारून पुन्हा तेच करत रहायचं...       वर्षभर पाण्यासाठी अविरत प्रयत्न करत राहायचं,लोकांना पाणी पाचवा पाणी जिरवा अशी संकल्पना सांगत सुटायचं., वृक्षारोपण करणे, गाळ काढणे, चरे खोदणे, जलसंधारणाची कामे करणे, शेतात विहिरी खोदणे, बोर मारून घेणे असे नानाविध अट्टाहास त्या पाण्यासाठी करत असतो.. पण प्रत्यक्ष पाणी उपलब्ध झालं की हे असं होतं..       भर उन्हाळ्यात लोकांची पाण्यासाठी वणवण पाहवत नाही, विहिरी कोरड्या पडलेल्या दिसतात, कित्येक गावात  टँकर ने पाणी शासनानेच पोचवाव असं गावकऱ्यांच म्हणणं असतं.  नद्यांचा मध्यातील दगड सुद्धा त्यादिवसात चमकत असतो, त्या दिवसात पाण्याची गरज अधिकच भासते आणि आपल्या जवळील पाणी संपले याची भावना फक्त त्याच दिवसात येते..       संस्कृती टिकणे खरंच गरजेचे आहे, पण संस्कृती टिकवायची झाल्यास त्याच संस्कृत...

शाळेतील आठवणी आणि संध्याकाळीची मस्त मेजवानी...!

      बालपण, शाळा, शाळेतील मित्रमंडळी, शाळेतील शिक्षक अश्या ह्यांना त्या गोष्टी आजही आठवलं की मनमुराद जगलेले प्रत्येक क्षण आठवतात. डोळ्यासमोर पुन्हा सगळं बालपण उभं राहतं, आता वेळ निघून गेलं आहे पुन्हा ते क्षण जगता येणार नाही माहिती असून सुद्धा पण त्या आठवणी त्या मित्रमंडळी भेटले की पुन्हा  बालपण डोळ्यासमोर उभा राहतो.     अशीच बालपण आणि शाळातील आठवणीनं दिवसभरात दररोज विविध कारणाने येत असतात .पण आज अचानक अनपेक्षित पल्लवीचा फोन आला होय तिचा फोन अनपेक्षित होत. पण सुरुवातिला तीच म्हणाली, वर्गातील इतर कोणाचे फोन आला होतं का ..? हा प्रश्नांतर क्षणभर माझ्या डोक्यात विविध विचार येऊन गेले होते कारण दिवसभरात एकाही वर्गमित्राचा फोन अथवा sms आला नव्हतं.   नंतर तीच म्हणाली की 'आज सगळ्याना आपल्याला भेटायचं आहे नियोजन सगळं झालं आहे' 6 वाजता आठवणीनं "पक्का सोलापूर" हॉटेल ला ये.     एवढं बोलून तीन फोन कट केलं पण माझी धावपळ होऊ लागली आधी दिवसभराच्या नियोजनात हे काही प्लॅन नव्हतं तरीही सारे मित्रमैत्रिणी येणार म्हंटल्यावर मीही सगळं पुढील प्लॅन कॅन्सल करून स...