जुनं_अलबम.. जुनी_आठवणी....
मला अजूनही आठवत मी त्यावेळी 3री ला होतो आणि माझ्या आयुष्यातील पाहिलं बक्षीस रुपये 124 रुपये घेऊन घरी आलो होतो.माझ्या आयुष्यातील ते पहिलच बिक्षीस होतं, ते मला मिळाल्याचा आनंद माझ्यापेक्षा माझ्या आईच्या चेहऱ्यावर दिसत होतं.आजही शाब्दिक आणि पारितोषिके देऊन कौतुक होतं असतात पण त्यादिवशी झालेल्या कौतुकाची तुलना होऊच शकत नाही असं मला आजही वाटतं.
मी त्यावेळी #3री ला #स्वामी_विवेकानंद_शाळेत शिकत होतो, शाळा जेमतेम 5 वी पर्यंत होतं. सर्वंगोष्टीत तेज तरबेज, दिसायला सूंदर असल्याने सगळ्या ठिकाणी माझं नाव पुढं येतं असतं, त्याच वर्षी वार्षिक स्नेहसंमेलन मध्ये पवार सर जे शाळेचे मुख्याध्यापक होते त्यांनी मला आणि अशोक नावाच्या माझ्याच वर्ग मित्राला माझ्या जोडीला देऊन एक नाटक बसवलं, आता नाटकाचा नाव नाही आठवत पण त्यावेळी ते नाटक करण्यासाठी खूप वेळा त्या बालमित्राच्या घरी येणं जाणं असतं ते मात्र हमखास आठवतोय, आमचं पाठांतर चांगलं असल्याकारणाने लवकरच आमचं नाटक बसलं आणि आम्ही रंगीत तालीम साठी सज्ज झालो..
ह्या नाटकात दोनच पात्र होते एक आबा म्हणजे माझा मित्र अशोक आणि मी रायबा झालो होतो. स्नेहसंमेलना दिवशी कांहीच नृत्य झाल्या नंतर लगेचच आमचं नाटक सुरू करण्यात आलं आणि सर्वांना तो नाटक खूपच आवडले हे लोकांच्या शिट्या आणि टाळ्यांवरून आम्हाला जाणवत होतं आम्ही आमचं नाटक संपलं म्हणून स्टेजच्या पाठीमागे थांबलो होतो,तेवढ्यात आम्हाला पुन्हा स्टेज वर बोलावण्यात आलं आणि आमच्या हातात हे बक्षीस रूपी रक्कम देण्यात आलं, जे जेमतेम 50 रुपयांच्या आसपास होत.
ती रक्कम हातात धरून पुन्हा पुन्हा त्या रकमेकडे मी पाहत होतो. माझा आनंद गगनात मावेनासा झाला. त्यानंतर आणखी दोन डान्स झाल्यानंतर पुन्हा एकदा मी स्टेज वर "#हिची_चाल_तुरु_तुरु_उडते_केस_भुरू_भुरू" हे गाणं मी गाणार होतो निवेदकांनी माझ्या नावाच आणि माझ्या गाण्याचे बोल सांगितल्यावर सगळीकडे शिट्या चा आवाज घुमू लागला मी गायला सुरुवात केली आणि सोबतीने माझ्या सोबतीला असलेली हिरॉईनने तीन तीच नृत्य सुरू केलं जे सर्वांना आकर्षित केलं, आणि मी पुन्हा एकदा रोख बक्षिसास पात्र ठरलो, खरंच खूप मस्त आठवणी आहेत जे मला आजही पुन्हा पुन्हा आठवत असतात...
हे असं काही आठवणी तो मिळालेला बक्षीस आणि लोकांकडून कौतुकाची थाप जी आजही पुन्हा पुन्हा हवीहवीशी वाटते..
----------✍️बसव
📲9604045418 / 8668306654

Comments
Post a Comment