Skip to main content

आठवणीने चित्र रंगवताना

हल्ली ह्या व्हाट्सप ने सुद्धा आपला रंग बदललं आहे, तोही आजकाल कोणाचे sms देत नाही. मी फक्त त्या फोन गॅलरीतल्या जुने फोटो पाहतो.त्याच जुन्या फोटोना तासनतास न्याहाळत असतो.तेही आजकाल खूपच बोलके झाले आहेत, हे कोण नवीन आणि ह्यातले हे जुने सगळे कोठे गेले असंच प्रश्न सतत पडत असतात, तेव्हा मात्र मी निषब्ध होऊन राहतो. ह्या पडलेल्या प्रश्नांना मात्र मी उत्तर देऊ शकत नाही.
        आधी मित्रांजवळ फोन नव्हते तेव्हा त्यांना फोन लावतो नव्हतो, फक्त हाक मारत होतो आणि ते धावत येत होते . आज सगळ्यांकडे फोन आहे, नावालाच व्हाट्सप चा ग्रुप आहे, संपर्क क्रमांक सगळ्यांचाच आहे पण साले संपर्कात कोणीच नाही.
ते दूर गेल्याच दुःख मांडावं की ते आपल्या आपल्या जीवनात प्रगती पथावर आहेत ह्याच आनंद साऱ्या जगाला सांगावं काही कळतच नाही.
रोजच एकमेकांचे वाढदिवस त्या सोशल साईट्सवर कळतच असतं, आणि मैत्री फक्त त्या सोशल साईट्सवर शुभेच्छा देऊन नात टिकविण्याचा प्रयत्न करत असतं. तेही दिवस भारी होते पार्टी आम्ही सुद्धा करत होतो, पार्टी म्हणजे खूप काही नव्हतं "एक कप चहा सोबत समोसा" एवढ्या मध्ये सगळं काही भागत होतं. पण हल्ली भेटल्यावर मिठी मारून शुभेच्छा तरी सोडा फोन लावून शुभेच्छा देणं सुद्धा विसरून गेलो आहोत.
एखाद्याच्या घरी शुभकार्यास न सांगता सुद्धा सगळे धावून जाणारे आम्ही आता मात्र त्यांने घरी येऊन निमंत्रण देण्याचे वाट पाहत आहोत.खरंच म्हणावसं वाटतं की प्रगती झाली आणि सारेच लांबले गेले.
अगोदर शक्तिमान, सुपरमॅन, परी, स्पायडर मॅन सारखे व्यक्ती स्वप्नांत यायचे ज्याने झोप पूर्ण व्हायची. हल्ली ना फक्त त्या वाढत असलेल्या कर्जाचे हप्ते, माझी फॅमिली, कामावरील बॉस अश्या स्वप्नाने झोप उडवली आहे, आणि उरावर टेन्शन नावाचा भूत येऊन बसला आहे.
प्रत्येक सण एकमेकांच्या घरी साजरी केली जात होती, आणि आता तेंव्हाचेच फोटो सोशल साईट्सवर टाकून मी मात्र त्या क्षणांना खूप miss करतोय असा #हॅश टॅग टाकतो. बाकी पुन्हा कोणी कोणाला भेटतच नाही का कुणास ठाऊक.
मग काय चालय आणखी...असा प्रश्न पडतो आणि काही नाही निवांत असाच समज मनाला टाकून मी मात्र मनातील प्रश्नांना तिथेच अडवतो...
आठवणींच्या धूसर रंगांना रंगीत बघण्याचा प्रयत्न करतो..
__________ ✍ बसव
9604045418

Comments

Popular posts from this blog

बालपण खूप सुखाचं होतं....!

फक्त त्यात आड यायची ती म्हणजे सकाळी 11 ते संध्याकाळी 5 दरम्यान एकाच रूम मध्ये 70-80 मुलांना कोंबून ठेवणारी शाळा , खड्या आवाजत गायलेलं राष्ट्रगीत, न सांगता सुट्टी घेतल्याची एखादी छडी, विशेष प्रसंगी धरलेले अंगठे, कविता पाठ नसताना ज्यानं बरोबर कविता म्हंटल त्याच्या हातानं स्वतःच्या गालावर उमटलेले चार बोट,एवढं होऊन सुद्धा "बस खाली माकडा" हे ऐकवणारे शाळेतील शिक्षक, जिथं जाताना त्या रामायणातील रामासारखं मी ही वनवासाला निगल्यागत वाटायचं...... ____________________ ©बसव

पुन्हा तेच...!

    "लोकासंगें ब्रम्हज्ञान आपण मात्र कोरडा पाषाण" अशी गत आपल्या समाजाची झाली आहे. फेसबुक व्हाट्सप वर वर्षभर पर्यावरण संबंधित बोधक विचार फिरवत राहायचं, पण प्रत्यक्ष कृती करण्याची वेळ आली की त्या विचारला नाकारून पुन्हा तेच करत रहायचं...       वर्षभर पाण्यासाठी अविरत प्रयत्न करत राहायचं,लोकांना पाणी पाचवा पाणी जिरवा अशी संकल्पना सांगत सुटायचं., वृक्षारोपण करणे, गाळ काढणे, चरे खोदणे, जलसंधारणाची कामे करणे, शेतात विहिरी खोदणे, बोर मारून घेणे असे नानाविध अट्टाहास त्या पाण्यासाठी करत असतो.. पण प्रत्यक्ष पाणी उपलब्ध झालं की हे असं होतं..       भर उन्हाळ्यात लोकांची पाण्यासाठी वणवण पाहवत नाही, विहिरी कोरड्या पडलेल्या दिसतात, कित्येक गावात  टँकर ने पाणी शासनानेच पोचवाव असं गावकऱ्यांच म्हणणं असतं.  नद्यांचा मध्यातील दगड सुद्धा त्यादिवसात चमकत असतो, त्या दिवसात पाण्याची गरज अधिकच भासते आणि आपल्या जवळील पाणी संपले याची भावना फक्त त्याच दिवसात येते..       संस्कृती टिकणे खरंच गरजेचे आहे, पण संस्कृती टिकवायची झाल्यास त्याच संस्कृत...

शाळेतील आठवणी आणि संध्याकाळीची मस्त मेजवानी...!

      बालपण, शाळा, शाळेतील मित्रमंडळी, शाळेतील शिक्षक अश्या ह्यांना त्या गोष्टी आजही आठवलं की मनमुराद जगलेले प्रत्येक क्षण आठवतात. डोळ्यासमोर पुन्हा सगळं बालपण उभं राहतं, आता वेळ निघून गेलं आहे पुन्हा ते क्षण जगता येणार नाही माहिती असून सुद्धा पण त्या आठवणी त्या मित्रमंडळी भेटले की पुन्हा  बालपण डोळ्यासमोर उभा राहतो.     अशीच बालपण आणि शाळातील आठवणीनं दिवसभरात दररोज विविध कारणाने येत असतात .पण आज अचानक अनपेक्षित पल्लवीचा फोन आला होय तिचा फोन अनपेक्षित होत. पण सुरुवातिला तीच म्हणाली, वर्गातील इतर कोणाचे फोन आला होतं का ..? हा प्रश्नांतर क्षणभर माझ्या डोक्यात विविध विचार येऊन गेले होते कारण दिवसभरात एकाही वर्गमित्राचा फोन अथवा sms आला नव्हतं.   नंतर तीच म्हणाली की 'आज सगळ्याना आपल्याला भेटायचं आहे नियोजन सगळं झालं आहे' 6 वाजता आठवणीनं "पक्का सोलापूर" हॉटेल ला ये.     एवढं बोलून तीन फोन कट केलं पण माझी धावपळ होऊ लागली आधी दिवसभराच्या नियोजनात हे काही प्लॅन नव्हतं तरीही सारे मित्रमैत्रिणी येणार म्हंटल्यावर मीही सगळं पुढील प्लॅन कॅन्सल करून स...