Skip to main content

हिंदवी परिवार आयोजित पन्हाळा ते पावनखिंड या तीन दिवसीय पदभ्रमती मोहिम

छत्रपती शिवरायांचा अभ्यास करताना महाराजांची चाणक्य नीती.कटाक्ष बुद्धिमत्ता व त्यांना लाभलेले अभियंता सारखे मावळ्यांचे इतिहास सहयाद्रीच्या कडेकपरातून फिरताना दिसून येते.
हिमालयाच्या पर्वतरांगा पाहण्यास जगभरातून लाखो लोक येत असतात पण जेवढी हिमालयाचे पर्वत सर करायाला हिम्मत लागते तेवढीच हिम्मत सहयाद्रीच्या पर्वत रांगा सर करायाला लागत असेल अस मला वाटत. तोच अनुभव मी हिंदवी परिवार आयोजित पन्हाळा ते पावनखिंड या तीन दिवसीय पदभ्रमती मोहिमेत अनुभवला।।

ह्या मोहिमेची सुरुवात नरवीर शिवा काशीद यांच्या समाधीस पुष्प अर्पण करून झाली. तेथे जमलेल्या मान्यवरांनी मोहीमेत सहभागी झालेल्या 703 शिवभक्तांना मार्गदर्शन केलं. त्यात मा.डॉ.जयसिंगराव पवार,मा.विश्वास नांगरे-पाटील,मा.आ.बच्चुभाऊ कडू,मा.पोपटराव पवार (हिवरे बाजार सरपंच ),मा.#विश्वास पाटील (कादंबरीकार),मा.चंद्रकांत गुडेवार ,(उपायुक्त,पुणे )मा.ओमप्रकाश शेटे,(OSD,Chief Minister) मा.श्रीकांतजी_कासट (दुर्गभ्रमंतीकर) शिवकालीन वेगवेगळ्या ऐतिहासिक पैलूंवर प्रकाश सुद्धा
टाकण्यात आला. यावेळी शिवभक्तांनी "जय जिजाऊ जय शिवराय" अशी घोषणा देण्यास सुरुवात केली आणि संपूर्ण पन्हाळा दुमदुमून गेला.शिवरायांनी कधी शेतकऱयांच्या पिकाच्या देठाला सुद्धा धक्का लावला नाही आणि कधी कोणाला लावू दिला नाही तीच शपथ घेऊन आम्ही पुढील प्रवासाला निघालो.
ह्या तीन दिवसीय मोहिमेची प्रत्यक्ष सुरुवात पुसाडी बुरुजापासून झाली व चालत चालत दुपारी विस्तीर्ण अश्या मसाई पठारवर येऊन पोहोचलो तेथे सर्वजण एकत्र जेवणाचा आस्वाद घेतला. मसाई पठारवरच्या विस्तीर्ण अशा जागेवर पसरलेले पावसातील हिरवळ आणि पावसाचे छोटे छोटे तलाव एक वेगळाच आनंद देऊन जात होता , अंगाला झोम्बणारा गार वारा, आणि ऊन पाऊस करत चालत होणारा प्रवास आणि मग काही तासाचे अंतर चालून झाल्यावर खोतवाडी ह्या पहील्या मुक्कामाच्या ठिकाणी सगळे पोहचलो ह्या मोहिमेत सांगितलेले सर्व नियम व अटी प्रत्य्रेकानी तंतोतंत पाळले आणि काहींनी तर या मोहिमेत स्वच्छतेचा संदेश देण्याचं काम केले हा पहिल्या दिवशीचा प्रवास साधारणतः 15 किलोमीटर चा होता
पहिल्या दिवशीचा मुक्काम होता तो घनदाट वाडीत वसलेल्या खोतवाडी या गावात. गावात राहायची सोय म्हणजे गावातल्या घरांमध्येच. पावसाळ्यात पाण्याची मुबलक व्यवस्था तिथे आहेच. रात्रीचा मुक्काम, जेवण करून आणि खोतवाडीतच सकाळी नास्ता वगैरे करून पुढची वाट सकाळी सुरू होते ती पांढरेपाणीच्या दिशेने.
दुसऱ्या दिवसाचा प्रवास जरा अवघड असल्याचं सगळ्यांकडून ऐकण्यात येत होतं. दुसर्या दिवशी ही अनेक छोटी मोठी गावे लागत जातात. शेतीवाड़ी तसेच आजुबाजुला जंगल आणि मधेच झोडपणारा पाऊस....आपण चालत असताना अचानक लागणारे ओढे नाले पार करत छोटे मोठे स्वच्छ पाण्याचे झरे, ओढे, नाले, चिखलवाट आणि जंगल अशी पायवाट करत निघालो होतो चारही दिशेला पाहिले तरी सगळीकडे फक्त झाडं झुडुपं दिसत होते .पहिल्या दिवशीचा त्रास आज काही प्रमाणात जाणवत होता .पण सोबत जे मावळे होते त्यांच्या जयघोषाने संपूर्ण जंगल दुमदुमून उठत होता आणि तोच आवाज आम्हला उर्जा देण्याचं काम करत होता. शेतांच्या बांधावरून चालताना पाय चिखलात रुतून बसत होते तर एखाद्या चढावर घसरतं असे, प्रत्येकाच्या मनात मदतीची भावना तेथे मला वेगवेगळ्या मार्फत दिसत होती कारण तेथे चिखलात अडकलेल्याला मदत करत होते तर कोणी तहान लागलेल्याला पाणी पाजत होते व वाटेवरील शेतात पडलेले चॉकलेट बिस्किटे चे प्लाक्टिक उचलून स्वतःच्या बॅगेत टाकत स्वच्छतेचा व गड किल्याचा संवर्धनाचा संदेश प्रत्येक जण देत होता
पांढरेपानी गावापर्यंत पोहोचताना शेवटचे १० किलोमीटर अंतर तर खूप त्रासदायक वाटत होतं. बुटामध्ये पाणी शिरल्याने टाचा व पायाच्या बोटावर दाब देऊन चालणं आता थोडंफार कठीण झालं होत आणि असं चालत चालत त्या दिवशी जवळपास 28 किलोमीटर चा प्रवास करत आम्ही शेवटचे गाव लागते ते म्हणजे पांढरेपनी ह्या मुक्कामाच्या ठिकाणी येऊन पोहोचलो
ह्या मोहिमेत अगदी शेवटचा व कमी अंतराचा प्रवास म्हणजे पांढरेपानी पासून पावनखिंड जे फक्त 6 किलोमीटर . पूर्ण डांबरी वाट. सोबत पाऊस सुध्दा होता जो आम्ही चालत एक तासात पूर्ण केला
तेथे गेल्यावर सर्व सन्मानीय व्यक्तीचे मनोगत व सहभागी झालेले मावळ्यांचे अनुभव ऐकायला मिळाले यात एकटा होता ज्याचं कौतुक करावे तितके कमीच ज्याला एक पाय नाही तो जयपूर फूट [कृत्रिम पाय] लावून अपंगत्वाची जाणीव न ठेवता स्वताच्या जिद्दीने व चिकाटीने हा संपूर्ण 52 किलोमीटर चा पदभ्रमती चा प्रवास त्यांना पूर्ण केला होता त्याला पाहून सगळ्यांच्या तोडून एकच शब्द निघालं "वा क्या बात हैं " हे अनुभव सांगताना त्यातलीच एक जी बिहार पटना हुन आलेली शीतल वर्मा जिल्हा मराठी बोलता सुद्धा येत नाही अशी ती तेथे आल्यावर मराठी भाषेच व शिवसंस्कृतीची प्रशंसा करत होती ते पाहुन मन भारावून गेले.त्यातनंतर शिव शाहिराच्या मुखातून निघालेला पोवाडा त्या पावनखिंडीत घडलेला इतिहासाला पुन्हा एकदा उजाळा निर्माण करण्याचा काम करत होत
त्यानंतर लगेचच शिवचरित्रकार शिवरत्न शेटे सरांच्या तोंडून बाजींचा रणसंग्राम हे रोमांचकारी व्याख्यान ऐकण्यासाठी प्रत्येकजण पावसाच्या मारा सोसत प्रत्यक्ष झालेल्या युद्धभूमीवर बसले होते .
ह्या व्याख्यानांनेच मोहिमेची सांगता झाली. प्रत्येकजण तिथली माती आपलया कपाळाला लावून व आपापल्या गावाला जायला निघालो व जाताना मोहिमेत सहभागी झालेल्या प्रत्येकाला एकच बोलू लागलो पुन्हा भेटू पुढल्या वर्षी स्वतःला संधी देऊन त्यावेळी मोठ्या जिद्दीने व नव्या जोमाने ह्या मोहिमेत सहभागी होऊ असे सांगत गावी निघालो
पन्हाळा ते पावनखिंड चा हा तीन दिवसाचा पदभ्रमंतीचा प्रवास किती रोमांचक होता हे शब्दात सांगणं खरच खुप अशक्य आहे आणि काही लोक म्हणतात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास फक्त पानातून नाहीतर प्रत्यक्ष रानातून गडकिल्यातून समजतो त्याची जाणीव करून घेण्यासाठी शिवचरित्रकार शिवरत्न शेटे सरांच्या नेतृत्वाखाली मी सुद्धा सहभागी झालो होतो. ह्या मोहिमेत सहभागी होण्याची तशी माजी पहिलीच वेळ होती पण तेथे गेल्यावर मला कळाल ह्या मोहिमेत सहभागी व्हायला साता जन्माची पुण्याई लागते आणि ते माज्या नशिबी आलं सुद्धा ..
ह्या मोहिमेत खूप मोठमोठे मंडळी सहभागी झाले होते वेगवेगळ्या राज्यातूना मुलंमुली सहभागी झालेलं होते आणि असे काही व्यक्ती होते ज्यांचे खास उल्लेख करावासा वाटतो ते म्हणजे अशी व्यक्तीचा सहवास आम्हाला लाभला जे आपापल्या अनुभवाने व कार्याने हिमालयाची उंची ते गाठले होते, पण त्यांच्या बरोबर चालताना मोहिमेत कधी उच्छ निच्छ्तेची भावना त्याच्या बोलण्यात किंवा वागण्यात दिसून आला नाही .
शेवटी इतकच सांगेन ह्या मोहिमेत सहभागी होऊन माज शिवरायांच्या मातीत जन्म घेतल्याचा सार्थकी लागलं
ह्या मोहिमेत सहभागी झाल्यावर वर्षभरासाठी पुरेल इतकी शिवऊर्जा मिळते ना ते ऊर्जा काय आहे जाणून घेण्यासाठी तरी प्रत्येकानी जीवनात अशी एखादी निसर्गाच्या सानिध्यात आणि शिवाजी महाराज्यांच्या ऐतिहासिक वाटेवर पदभ्रमंती केली पाहिजे ह्या मोहिमेत सहभागी झाल्यानंतर दिवस फक्त आणि फक्त शिवाजी महाराजांचाच विचार डोक्यात येतील ह्या व्यतिरिक्त दुसरे कुठलेलंही विचार डोक्यात येणार नाही अशी जीवनात कलाटणी देण्याचं काम हि मोहीम करते अश्या या मोहिमेत मी सहभागी झालो याचा खुप आनंद आहे
"जय जिजाऊ जय शिवराय"

____________✍️बसव
📲9604045418

Comments

Popular posts from this blog

बालपण खूप सुखाचं होतं....!

फक्त त्यात आड यायची ती म्हणजे सकाळी 11 ते संध्याकाळी 5 दरम्यान एकाच रूम मध्ये 70-80 मुलांना कोंबून ठेवणारी शाळा , खड्या आवाजत गायलेलं राष्ट्रगीत, न सांगता सुट्टी घेतल्याची एखादी छडी, विशेष प्रसंगी धरलेले अंगठे, कविता पाठ नसताना ज्यानं बरोबर कविता म्हंटल त्याच्या हातानं स्वतःच्या गालावर उमटलेले चार बोट,एवढं होऊन सुद्धा "बस खाली माकडा" हे ऐकवणारे शाळेतील शिक्षक, जिथं जाताना त्या रामायणातील रामासारखं मी ही वनवासाला निगल्यागत वाटायचं...... ____________________ ©बसव

पुन्हा तेच...!

    "लोकासंगें ब्रम्हज्ञान आपण मात्र कोरडा पाषाण" अशी गत आपल्या समाजाची झाली आहे. फेसबुक व्हाट्सप वर वर्षभर पर्यावरण संबंधित बोधक विचार फिरवत राहायचं, पण प्रत्यक्ष कृती करण्याची वेळ आली की त्या विचारला नाकारून पुन्हा तेच करत रहायचं...       वर्षभर पाण्यासाठी अविरत प्रयत्न करत राहायचं,लोकांना पाणी पाचवा पाणी जिरवा अशी संकल्पना सांगत सुटायचं., वृक्षारोपण करणे, गाळ काढणे, चरे खोदणे, जलसंधारणाची कामे करणे, शेतात विहिरी खोदणे, बोर मारून घेणे असे नानाविध अट्टाहास त्या पाण्यासाठी करत असतो.. पण प्रत्यक्ष पाणी उपलब्ध झालं की हे असं होतं..       भर उन्हाळ्यात लोकांची पाण्यासाठी वणवण पाहवत नाही, विहिरी कोरड्या पडलेल्या दिसतात, कित्येक गावात  टँकर ने पाणी शासनानेच पोचवाव असं गावकऱ्यांच म्हणणं असतं.  नद्यांचा मध्यातील दगड सुद्धा त्यादिवसात चमकत असतो, त्या दिवसात पाण्याची गरज अधिकच भासते आणि आपल्या जवळील पाणी संपले याची भावना फक्त त्याच दिवसात येते..       संस्कृती टिकणे खरंच गरजेचे आहे, पण संस्कृती टिकवायची झाल्यास त्याच संस्कृत...

शाळेतील आठवणी आणि संध्याकाळीची मस्त मेजवानी...!

      बालपण, शाळा, शाळेतील मित्रमंडळी, शाळेतील शिक्षक अश्या ह्यांना त्या गोष्टी आजही आठवलं की मनमुराद जगलेले प्रत्येक क्षण आठवतात. डोळ्यासमोर पुन्हा सगळं बालपण उभं राहतं, आता वेळ निघून गेलं आहे पुन्हा ते क्षण जगता येणार नाही माहिती असून सुद्धा पण त्या आठवणी त्या मित्रमंडळी भेटले की पुन्हा  बालपण डोळ्यासमोर उभा राहतो.     अशीच बालपण आणि शाळातील आठवणीनं दिवसभरात दररोज विविध कारणाने येत असतात .पण आज अचानक अनपेक्षित पल्लवीचा फोन आला होय तिचा फोन अनपेक्षित होत. पण सुरुवातिला तीच म्हणाली, वर्गातील इतर कोणाचे फोन आला होतं का ..? हा प्रश्नांतर क्षणभर माझ्या डोक्यात विविध विचार येऊन गेले होते कारण दिवसभरात एकाही वर्गमित्राचा फोन अथवा sms आला नव्हतं.   नंतर तीच म्हणाली की 'आज सगळ्याना आपल्याला भेटायचं आहे नियोजन सगळं झालं आहे' 6 वाजता आठवणीनं "पक्का सोलापूर" हॉटेल ला ये.     एवढं बोलून तीन फोन कट केलं पण माझी धावपळ होऊ लागली आधी दिवसभराच्या नियोजनात हे काही प्लॅन नव्हतं तरीही सारे मित्रमैत्रिणी येणार म्हंटल्यावर मीही सगळं पुढील प्लॅन कॅन्सल करून स...