महाराजांचा इतिहास पहिला तरया राजाच्या आचारांचा, विचारांचा जागर जनसामान्यात रुजायला हवं.
पण आपण महाराजांचे ऎतिहासिक आठवणींना जतन व संवर्धन करायचे सोडून आपण आपापसातल्या हट्ट आणि वर्चस्व टिकून रहावा म्हणून परत त्यांच्या नावाने नवीन स्मारके उभे करत आहोत.छत्रपती शिवाजी महाराज यांना मूर्ती मधून किंवा प्रतिमेतून त्यांचा इतिहास आजकालच्या तरुणांना आठवणीत राहणार आहेत का ?
शिवाजी महाराजांचं कर्तृत्व आणि नेतृत्व आणि शिवाजी महाराजांचा जनसामान्याबद्दलब जी आदर आणि आपुलकी होती त्याच कारणामुळे ते आतासुद्धा आपला प्रत्येकाच्या मनामनात आहेत.गेल्या साडेतीनशे वर्षानंतरही महाराजांबद्दल लोकांमध्ये जी प्रतिमा आहे ती एवढ्यासाठी की त्याच्या विचारांचा वारसा आजही आपल्या मध्ये कोठे तरी वास करतोय.
शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानी पावन झालेल्या किल्ल्यांची वारसा जतन आणि तिथल्या आजूबाजूच्या परिसराचा विकास केलातरच आपण शिवाजी महाराजांचा इतिहास पुढच्या पिढीसमोर मांडू शकणार आहोत.शिवाजी महाराजांनी आपल्या कारकिर्दीत कित्येक किल्ले बांधले कितीतरी किल्ले लढाई करून युद्धनीती रचून जिंकले सर्व किल्ले आजही महाराजांचा पराक्रमाची गाथा गात आहेत.
काही मोजकेच किल्ले आम्हाला माहित आहेत. पण प्रत्यक्षात शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ले, बुरुज, खिंडी, देवळे आपली वाट पहात आहेत,
याची माहिती आम्हाला कधी होणार आम्ही केव्हा जागे होणार?
अशा खूप ठिकाणांची माहिती आज हरवत आहे. किल्ल्याचे बुरुज आपणहून ढासाळत आहेत,
तर काही ठिकाणी त्या इतिहासाच्या पाऊलखुणा आपणच पुसून टाकत आहोत.
महाराजांचा इतिहास आपल्या शिक्षण व्यवस्थेत काहीप्रमाणातच आहे खरा, पण तो इतिहास शिकविताना महाराजांचाबद्दलची संपूर्ण माहिती,पराक्रमाच्या गाथा त्या त्या ठिकाणी नेऊन समजावली गेली पाहिजे.
महाराजांच्या मावळ्यांच्या बलिदानाच्या पराक्रमाच्या गाथांना आम्ही एवढ्या लवकर विसरतोय...!
जय शिवराय
_____________बसव
9604045418

Comments
Post a Comment