28 मे हा दिवस जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन* म्हणून जगभर साजरा केला जातो ...
पिरेड अर्थात मासिक पाळी आली की आई, बहीण आणि बायको,गल्लीतल्या पोरी लांब बसायच्या. शिवू नका, लांब सारखा अशा धमक्या मिळायच्या.
चुकून कधी शिवलचं तर घरातल्या मोठ्या व्यक्ती कडून मार सुद्धा बसायचा.
मग आईला विचारलं काय ग आई, का शिवायचं नाही ?
तेव्हा आई कावळ्याने शिवलय देवाने सांगितलंय असं सांगायची.
तिला 5 दिवस पाणी, जेवण आणि सगळंच लांबून देणे. अस ऐकण्यात आलं पण कधी प्रत्यक्ष कधी पाहीलो नाही. तिची या पाच दिवसातली कपडे वेगळी असायची.
या अजाणत्या वयात एकही जाणता पुरुष अथवा स्त्री भेटली नाही की जो पाच दिवसाचं महत्व आणि त्रास समजावून सांगेल.
या गोष्टींकडे आपन कधी उघड्या आणि वैद्न्यानिक दृष्टिकोनाने पाहिलेलच नाही.
मासिक पाळी ही बाईची कमजोरी नसून या निसर्गाने बाईला दिलेली ही वेगळीच शक्ती आहे. की जी तीला आई बनण्याचे सुख अदा केली आहे.
आता मोठं झालो तरी ही ह्या पाच दिवसाची काही गुप्तता कळालीच नाही.
पण कॉलेजवयात काही मित्र - मैत्रिणी कडून माजकमस्ती मध्ये ही भानगड काय असते ते थोडंफार समजलं.
ह्या दिवसांची तीव्रता आणि त्रास समजायला लागला.
एखाद्या स्त्री ला जी त्रास सुरू झाल्यावर ती ढसाढसा रडते, तेव्हा आपण काहीच करू शकत नाही
मुळात गडबड आहे ना ती इथल्या घाणेरड्या मेंदूत आहे.
स्त्री केवळ भोगवस्तु म्हणून पाहणाऱ्या इथल्या घानेरड्या पुरुषी मानसिकतेचा..
हे सगळं का चालु आहे याचं कारण ती अजून गप्पच आहे. ती विरोध करत नाही. ती मुकाट्यांन सहन करते. बसव
वाचण्यात आलेली गोष्ठ म्हणजे
खरतर पाच दिवस हे नावाला असतात. मात्र पाळी येण्याच्या आधी दोन दिवस पाळीचे चार दिवस त्रास आणि त्यांनंतरचे दोन-तीन दिवस अशक्तपणा या गोष्टीचा सामना महिलांना करावा लागतो.
या पाच दिवसात पहिल्या दोन दिवस त्यांना फार त्रास होतो. यावेळी त्यांना जवळीकीची आणि प्रेमाची गरज असते. यावेळी हातपाय चेपून देण्याची गरज असते.
आता वाटत की आपण शिक्षित आहोत म्हणून या अपेक्षा आपण नक्की पूर्ण कार्याला हवं.
आता खरंच गरज आहे तीला समजून घेण्याची. तिच्या मासिक पाळीला समजून घेण्याची. तिच्या भावनांना समजून घेण्याची.
____________ ✍️बसव
9604045418

Comments
Post a Comment