बालपणीचा काळ सुखाचा आणि आनंदाचा असतो. ना कसली चिंता ना कसली काळजी, मनसोक्त खेळा, हसा, आनंद लुटा... पण असा हा सुखाचा काळ काही मोजक्याच मुलांच्या नशिबात असतो. आपल्याला इतरत्र फिरताना समाजात पोटाची खळगी भरण्यासाठी सिग्नलजवळ काही वस्तू विकणारी मुले, हॉटेल, बसस्थानक, रेल्वे स्टेशनवर पाणी वाटणारी, टेबल साफ करणारी मुले पाहतो. अशा मुलांना कुठे सुखाचे बालपण अनुभवायला मिळते... कायदा भरपूर आहेत पण त्यांचे बालपण तर हरवून गेलेच आहेत ना...!
14 वर्षांखालील जी मुले स्वत:साठी आणि आपल्या परिवाराच्या उदरनिर्वाहासाठी मोलमजुरी करतात त्यांना बालकामगार म्हणतात. ज्या वयात शाळेत जावून शिकायचे, खेळायचे, बागडायचे त्या वयात हातात झाडू घेऊन साफ-सफाई करायची, लोकांच्या घरची भांडी धुवायची,विटा उचलायची दगड फोडायचे अशी अनेक कामे करावी लागतात.
बोटं लावील ते वस्तू आणून देणारी होशी आई-बाबा सोबतच जबरदस्तीने किव्हा नाईलाजाने कामावर पाठविणारी नाईलाज मायबाप. हे दोन्ही चित्र आपल्याच समाजात पाहायला मिळणं...हा समाजापुढे एक मोठा प्रश्नच आहे. 12 जून हा दिवस देशात सगळीकडे बालकामगार विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. बालकामगारांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरिता शासनाच्यावतीने विविध उपक्रम, योजना राबविल्या जातात. दरवर्षी या दिवशी समाजातील ह्या प्रश्नावर समाज माध्यमे आपली मतं मांडताना, समाजातील दाहकता लोकांसमोर मांडत असतात..पण प्रत्यक्षात कृती होताना खूप कमी प्रमाणत दिसते.. ह्या बालकामगारांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काही सामाजिक प्रकल्प, सुद्धा तितक्याच जोमाने आपले सर्वस्व अर्पण करून कार्य करताना समाजात दिसत आहेत...पण प्रश्न मिटतोय का ह्यावरही संशोधन होणे गरजेचे आहे...
बालपणातच पैशाची गोडी आणि आणि कामाच्या माध्यमातून जोडली गेलेली व्यसनाधीनता ही आलेख दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.. हा आलेख फक्त सामाजिक संस्था अथवा शासन व्यवस्थेवर अवलंबून न राहता उतरवले अश्या आशे वर न बसता समाजात राहणाऱ्या प्रत्येकांनी पुढाकार घ्यावा.. सुरुवात अपल्यापासून केली की ती सगळं काही बदलत जात हे तितकंच खरं... 14 वर्षा खालील मुलाला आपल्याकडे कामाला न ठेवणे हा सुद्धा एक पाऊल असेल जो हा आलेख उतरविण्याठी महत्वाचा ठरेल..
_________________✍️बसव
📲9604045418

Comments
Post a Comment