एक महिन्यामध्ये सलग ५ सुवर्णपदक मिळवणे असामान्य गोष्ट आहे. ते करून दाखवलंय आपल्या सुवर्णपरी हिमा दासने. वाऱ्याच्या वेगाने धावणारी १८ वर्षाची हिमा दास भारताची “सुपर गर्ल” म्हणून ओळखली जाऊ लागलीय. सगळीकडे भारताच्या नावावर सन्मानाचे पदक घेऊन येऊन हिमाने नवीन रेकॉर्ड तर रचलेच आहेत सोबतच आपली मान अभिमानाने उंचावली आहे. अर्थात हा प्रवास तिच्यासाठी अजिबात सोपा नव्हता. दिवसभर अंग पिळवटून जाईपर्यंत मेहनत करून नंतर पोटभर जेवून मऊ गादीवर लोळण्याइतकं तर सोडा पण साधं धावताना पायात धावण्यासाठी उपयुक्त असणारे जोडे देखील हिमा घेऊ शकली नव्हती. तशी परिस्थितीही नव्हतीच म्हणा. “ढिंग एक्सप्रेस ते सुपर गर्ल” हिमा दास आसाममधील ढिंग, नागाव या छोट्याश्या गावात लहानाची मोठी झाली. ५ भावंडात सर्वात लहान असलेली हिमा जोनाली दास व रणजित दास यांची मुलगी आहे. हिमाचे आईवडील शेतकरी असून त्यांची भाताची शेती आहे. लहान असताना हिमा आपल्या वडिलांच्या शेतजवळच सामावसक मुलांसमवेत फुटबॉल खेळात असे. तिचा कल फ़ुटबाँल मध्ये असला तरीही तिच्या धावण्याचा वेग पुष्कळ चांगला होता...
" जगावेगळं काम करायला सगळ्या जुन्या वाटा सोडायची आणि चौकटी मोडायची गरज नाही ..मनापासून जगता जगता अगदी सहज जगावेगळं काम होऊन जातं "